Posts

Showing posts with the label दुकानगाळ्यासमोर

उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, पादचारी चिंताग्रस्त . " ग्राहकांची लुट ,पादचारी चिंताग्रस्त."

Image
  उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, दुकानदार मस्त,         "  ग्राहकांची लुट ,पादचारी  चिंताग्रस्त." उंडाळे - प्रतिनिधि,  ( प्रदिप पाटील.) कराड ते येणपे पर्यंत नव्याने होत असलेला मार्ग व विस्तारणीकरणाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु असुन सदरील मार्ग भविष्यकाळात दळणवळणामुळे मैलाचा ठरणार असुन यामुळे या परिसराची प्रगती होईल यात तिळमात्र शंकाच नाही. मात्र रस्त्याच्या विस्तारणीकरणा गैरफायदा घेत उंडाळे बस्थानक परिसरात रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या"गटर वजा फुटपाथ"वर अतिक्रमण करत भाजीपाला, वडापाव,फळ विक्रत्यांनी व्यवसाय उभारलाय . यात कीती जण हे परवाना धारक आस्थापना  चालवतात हे पहावे  लागेल. सेवा  देणारे मनमानी दराने ग्राहकांची लुट करतात. ग्रामिणभाग असलेने  या गोष्टी  ग्राहक  पहात नाही पण कर  रूपाने  मिळत असलेला कर बुडतो व विकासाच्या चक्राला बाधा येते. आपल्या आस्थापना मालकी परवाना, ठीकाण,आस्थापनाचे नाव याचे  प्रमाणपत्र ग्राहकाला दिसेल असे लावणे बंधनकारक आहे .हे या ठीकाणी फार दुर्मिळ दिसत किंबहुना दिसतही नाही....