उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, पादचारी चिंताग्रस्त . " ग्राहकांची लुट ,पादचारी चिंताग्रस्त."
उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन सुस्त, दुकानदार मस्त,
" ग्राहकांची लुट ,पादचारी चिंताग्रस्त."
उंडाळे - प्रतिनिधि, (प्रदिप पाटील.)
कराड ते येणपे पर्यंत नव्याने होत असलेला मार्ग व विस्तारणीकरणाचे काम सध्या युध्द पातळीवर सुरु असुन सदरील मार्ग भविष्यकाळात दळणवळणामुळे मैलाचा ठरणार असुन यामुळे या परिसराची प्रगती होईल यात तिळमात्र शंकाच नाही. मात्र रस्त्याच्या विस्तारणीकरणा गैरफायदा घेत उंडाळे बस्थानक परिसरात रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या"गटर वजा फुटपाथ"वर अतिक्रमण करत भाजीपाला, वडापाव,फळ विक्रत्यांनी व्यवसाय उभारलाय .
यात कीती जण हे परवाना धारक आस्थापना चालवतात हे पहावे लागेल. सेवा देणारे मनमानी दराने ग्राहकांची लुट करतात. ग्रामिणभाग असलेने या गोष्टी ग्राहक पहात नाही पण कर रूपाने मिळत असलेला कर बुडतो व विकासाच्या चक्राला बाधा येते.
आपल्या आस्थापना मालकी परवाना, ठीकाण,आस्थापनाचे नाव याचे प्रमाणपत्र ग्राहकाला दिसेल असे लावणे बंधनकारक आहे .हे या ठीकाणी फार दुर्मिळ दिसत किंबहुना दिसतही नाही.
अन्न तयार करून विक्री करणे या आस्थापना आवश्यक परवानगी घेवून सुरू झालेत का कींवा त्या परवानगी साठी स्थानिक प्रशासनाने त्यांना आग्रह धरला असेल तर आज सर्व आस्थापना धारक हे त्या त्या विभागाच्या परवानगी घेवून आपली आस्थापना सुरु करतील त्यामुळे लोकांचे आरोग्य व आर्थिक लुट थांबेल. माल खरेदी बील पावती दिली जात नाही.मग तो माल कितीही कीमतीचा असो.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या असणाऱ्या गाळे धारकाचेही दिवसेंदिवस अतिक्रमण पादचारी मार्ग 'फुटपाथ' व्यापल्याचे चित्र असुन संबंधित उंडाळे ग्रामपंचायत प्रशासन याच्याकडे डोळेझाक करत आहे.
उंडाळे बसस्थानक परिसरात वारंवार वाहनाचे व पादचाऱ्यांच्या अपघातात वाढ होत असून रस्त्यालगत नाला वजा फुटपाथ बांधण्यात आले आहेत , त्याच्यावर काही व्यवसाईकानी वेळोवेळी अतिक्रमण करुनही संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचाऱ्यांनकडुन संबंधित व्यवसायिकाना अभय मिळत आहे.अनेकांनी पत्र्याची शेड व गाडे उभारणी तसेच दुकानाचे फलक लावून अतिक्रमण केले. याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात असतात. अशातच अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद बनत चालल्याने वाहनधारक व पादचाऱयांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी
लोकांच्याकडून वारंवार होते आहे.
ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्यापुढे अतिक्रमण..
उंडाळे ग्रामपंचायतीमार्फत भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या दक्षिणमुखी गाळ्यासमोर पक्क्या स्वरुपाचे पत्राच्या शेडचे अतिक्रमण तर झालेच असुन ही या शेडच्या समोर पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या नाले वजा फुटपाथवर ही सदरील गाळेधारकांनी दुकाचे जाहिरात बोर्ड, मोठमोठ्या छत्री,तरी काही ठिकाणी फुटपाथचं कायम स्वरुपी बंद केल्याचे दिसुन येते.





Comments
Post a Comment