"रात्रीस खेळ चाले" खरचं प्रशासन अनभिज्ञ आहे का??? "मुरुम , भराव साठी वाळु , रात्रीच्या अंधारात चोरी".
"रात्रीस खेळ चाले" खरचं प्रशासन अनभिज्ञ आहे का???
"मुरुम भराव साठी ,वाळु , रात्रीच्या अंधारात चोरी"
उंडाळे - प्रतिनिधि,(प्रदीप पाटील)
ओंड -उंडाळे-येळगाव परिसरातील असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये गौण खनिजाचे उत्खननचे प्रमाण वाढलेले दिसून येत असुन या सर्व ठिकाणी जेसीबी व पोकलेन यासारख्या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून ठीक ठिकाणी मुरूम उत्खननाचे प्रमाण वाढलेले आहे. डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक जोमात सुरू आहे. महसूल खात्याची परवानगी, सरकारची रॉयल्टीला ठेंगा दाखवत हजारो ब्रास मुरूम उत्खनन व वाहतूक केली जात असुन मात्र या विभागातील जबाबदार प्रशासकीय अधिकारी गाढ झोपेचे सोंग घेवुन असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
राजकीय वरदहस्त व गलथान प्रशासन अधिका-याच्या बेजबाबदारपणामुळे ओंड,उंडाळे, जिंती तुळसण,घोगाव, येणपे या भागातील गौण खनिज चोरीला लगाम लावणे अशक्य झाले आहे. दरम्यान, वेगवेगळ्या ठेकेदार , जेसीबी मशीन मालकानकडुन बेकायदा उत्खनन करुन चोरी होत आहे.
रॉयल्टी भरण्यांच नाटक,परवाना कमी मुरुमाचा उत्खनन बेसुमार . मुरुम उकरुन रस्त्याच्यासह नविन बांधकाम सुरु असलेल्या घर भराव कामासाठी त्याचा वापर केला जात होता. संबंधित ठेकेदार जेसीबी मशीन मालकाना फुकटात हजारो ब्रास मुरुम, माती उपलब्ध होत असताना कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी बुडत आहे. डोंगराचे सपाटीकरण केले जात आहेत.
मुरुम उत्खनन व वाहतूकीसाठी सध्या या भागात वेगवेगळ्या गावातील ट्रक्टर व्यवसायिक व जेसीबी मशीन मालकाच्या टोळ्या आघाडीवर असुन उत्खनन व वाहतुक ही रात्रीच्या अंधारातुन केली जात आहे. रात्री १२ ते १ सुमारास या खेळास सुरुवात केली जाते तर रात्रभर दहा -पंधरा ट्रक्टराचं थैमान सुरु असतं .
स्थानिक प्रशासनास काडीमात्र कल्पनाच नसेल का ? का सर्व काहि माहित असुनही जाणीव पुर्वक त्यांच्याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केली जात असल्याची खुमासदार चर्चा मात्र परिसरात होत आहे.
दक्षिण मांड पहाटे पहाटे जेसीबी रडारवर..
येणपे पासुन काले परिसरात दक्षिण मांड नदितील भराव्यासह काहि ठिकाणी बांधकामास उपयुक्त असणाऱ्या वाळु पहाटेच्या वेळी स्थानिक जेसीबी मशीन मालकाचे आंदण असल्याच्या अविर्भावात त्यांच्यातुन वाळु चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे . अगोदरच दक्षिण मांडच्या दोन्ही बाजुस अतिक्रमणाचा विळखा झाला असुन शिल्लक असणाऱ्या पात्रातही जागोजागी वाळु चोरीतुन मोठमोठ्या खड्डे ही शेतकर्यांची डोकेदुखी ठरत असुन संबंधित प्रशासनाने याच्याकडे ही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment