तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम.
तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम.
कराड - प्रतिनिधि,
सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी ग्रामपंचायतीचे काम आदर्शवत आहे या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अरुणा विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीचे योग्य प्रकारे काम सुरू आहे त्यांच्या सोबत उपसरपंच राहुल डांगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य हे खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.बाबासाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीने आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळवले. घरकुल योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर डिजिटल नॉलेज व्हिलेज राज्यात प्रथम, निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, आदर्श सरपंच पुरस्कार, पर्यावरण संतुलित योजना पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार अशा प्रकारे चे तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी खोजेवाडी ग्रामपंचायत राज्यातही प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या चे सर्व श्रेय या गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अरुणा विजय जाधव आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानामुळे शक्य झाले.

Comments
Post a Comment