कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी कठोर नियम लागु . __जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इ. ठिकाणी
कठोर नियम लागु .
__जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी.
सातारा जिल्ह्यात रात्रीचे 11.00 वाजेलेपासून ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार, दुकाने, हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्स इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. हॉटेल, रिसॉर्ट,लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-19 च्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापन यांचेकडून प्रथमवेळी रक्कम रु. 25 हजार दंड, तसेच दुसऱ्यांदा भंग झाल्यास रक्कम रु. एक लाख दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Comments
Post a Comment