महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

 महाराजस्व समाधान शिबीर  संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

 

उंडाळे - प्रतिनिधी.

घोगाव येथील  संतकृपा शिक्षण संस्था, फार्मसी काॅलेजमध्ये भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष आमदार मा.श्री.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) व तहसील कार्यालय कराड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती श्री.शिवाजी महाराज "महाराजस्व समाधान शिबीर" उत्साहात पार पडले.या शिबिरात कराड दक्षिण मधील, उंडाळे विभागातील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला व डोमासाइल वितरण करण्यात आले.यावेळी नायब तहसीलदार श्री.बाजीराव पाटील, काॅलेज ऑफ डी फार्मसी च्या प्राचार्य सौ.वैशाली पाटील, घोगाव महसूल अधिकारी सौ.तृप्ती दाते, भाजपा कराड दक्षिण तालुका अध्यक्ष श्री.प्रविण साळुंखे, अँड. श्री.बाळासाहेब पाटील, सातारा जिल्हा सोशल मिडिया उपाध्यक्ष श्री.पंकज पाटील, माजी उपसरपंच सवादे श्री.संजय शेवाळे, माजी सरपंच टाळगाव श्री.आण्णासाहेब जाधव, माजी सरपंच म्हासोली श्री.आण्णासाहेब शेवाळे, चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव मा.अक्षय शेटे, उपसरपंच घोगाव श्री.निवास शेवाळे, माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी येळगाव श्री.बाजीराव शेटे (सर), माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी टाळगाव श्री.अशोक पाटील, माजी उपसरपंच लोहारवाडी श्री.बाबासाहेब पवार, पै.श्री.परशुराम गोंदळी, श्री.बाबासाहेब साळूंखे, श्री.रविंद्र सपकाळ, श्री.पोपटराव साळुंखे, श्री.सुरेश मोहिते, श्री.साहेबराव साळुंखे, मा.संभाजी नांगरे, श्री.प्रकाश पाटील (आबा), येळागाव जिल्हा परिषद गटातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .