“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!”

“जिसकी जितनी संख्या भारी – उतनी उसकी हिस्सेदारी!”

‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ भव्यदिव्य आयोजन.

 गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

जननायक बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त भव्य आयोजन गडचिरोली येथे दिनांक  १५ - १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, भारतीय आदिवासी परिषद आणि आदिवासी-दलित एकता परिषद  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी जनचेतना महासम्मेलन’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा दोन दिवसीय ऐतिहासिक सोहळा १५ व १६ नोव्हेंबर २०२५ रोजी वीर बाबुराव शेडमाके सभागृह परिसर, गडचिरोली येथे पार पडणार आहे.या महासम्मेलनाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक आहेत – ॲड. डॉ. सुरेश माने, संस्थापक अध्यक्ष, बी.आर.एस.पी. तसेच भारतीय आदिवासी परिषद व आदिवासी-दलित एकता परिषद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.महात्मा फुले, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित सामाजिक समता, स्वाभिमान, राजकीय हक्क आणि सांस्कृतिक ओळख या विषयांवर व्यापक जनजागृती घडवून आणणे हा या महामेळाव्याचा हेतू आहे. आदिवासी संस्कृती, अस्मिता व अधिकार यावरील महाजन वर्गाचे आक्रमण शिवाय आदिवासींच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेच्या अभावाचे परिणाम याबाबत विस्तृत चर्चा आणि परिसंवाद घेण्यात येणार आहेत. त्यात "आदिवासी बिरसा संघर्ष व वर्तमान आदिवासी संघर्ष समोरील आव्हाने", "आदिवासी-दलित संघर्ष-राजकारण व भवितव्य" ही जाहीर चर्चासत्रे, "आदिवासी राजकीय सांस्कृतिक लढा दिशा व आव्हाने" जाहीर मुलाखत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन आहे. 

        या जनचेतना सम्मेलनातून आदिवासी समाजवर्गामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत हितसंबंधीयांकडून हेतुपुरस्सर जे गैरसमज केले गेले आहे त्याचाही समाचार घेण्यात येणार आहे.

या प्रसंगी ॲड. डॉ. सुरेश माने लिखित ‘आदिवासी शोषण–संघर्ष–सरकारी नीती: दिशा-दशा-आव्हाने’ या महत्त्वपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन होणार असून, या पुस्तकात आदिवासी समाजाच्या संघर्षाची सखोल मांडणी करण्यात आली आहे.

मुख्य अतिथी व विशेष पाहुणे म्हणून मा. संभाजी सरकुंडे (पूर्व IAS अधिकारी), मा. ई. झेड. खोब्रागडे (पूर्व IAS अधिकारी), खासदार उमेश पटेल, लोकेंद्र सिंग, लटारी मडावी, रोहिदास राऊत, गुरुदास कन्नाके, फगुलाल नागेश, संजय लोहकरे, डाॅ. चंद्रशेखर बांबोळे, मेघनाथ गवळी, ॲड. भूपेंद्र रायपुरे, डाॅ. सचिन मडावी, मारुतीशेठ वायाळ, लक्ष्मण घोडाम, भिमसिंग वळवी, भिकलभाई खुलात, माधव सरकुंडे, सुरेश केदारे,  धम्मकीर्ती महाराज आदि मान्यवरांची उपस्थिती व सहभाग राहणार आहे. या भव्य कार्यक्रमास गुजरात, मध्य प्रदेश,  तेलंगणा,  छत्तीसगढ़ व प्रदेशभरातील आदिवासी, दलित, ओबीसी आणि सर्व प्रगतिशील घटक उपस्थित राहणार असून सर्व आदिवासी समाजाने या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक पंकज चाळके   महाराष्ट्र अध्यक्ष- बी. आर. एस. पी. युवा आघाडी यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .