राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ग्रंथालय क्लब आयोजित शैक्षणिक लेखनासाठी ज्ञानसाधनांच्या शोधावरील राज्यस्तरीय कार्यशाळा.

 

राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ग्रंथालय क्लब आयोजित शैक्षणिक लेखनासाठी ज्ञानसाधनांच्या शोधावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.

कासेगाव – प्रतिनिधी.

 राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने “शैक्षणिक लेखन करताना आवश्यक असलेल्या विविध माहितीस्त्रोतांचा अभ्यास व शोध घेणे” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला राज्यभरातून सुमारे 70 सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचे आयोजन दोन स्वतंत्र सत्रांत करण्यात आले होते.पहिल्या सत्रात प्रख्यात माहितीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुधीर नगरकर यांनी “New Trends in Library and Information Literacy” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल युगातील प्रगत लायब्ररी सेवा, ई-रिसोर्सेसचा प्रभावी वापर, माहिती शोध तंत्रे, तसेच विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी माहिती साक्षरता विकसित करण्याची गरज यांवर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.

दुसऱ्या सत्रात संशोधन लेखनातील निपुण मार्गदर्शक डॉ. कांतीलाल ताम्हणे यांनी “How to Write a Research Paper” या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. संशोधन समस्या निवड, साहित्य समीक्षा, संशोधन पद्धती, संदर्भलेखन, साहित्य चोरी (Plagiarism) टाळण्यासाठी योग्य उपाय, तसेच जर्नल निवडण्यापासून प्रकाशन प्रक्रियेपर्यंतची सुलभ माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना संशोधन लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले.कार्यक्रमाचे समुपदेशक म्हणून कॉलेजचे ग्रंथपाल श्री. एस. जी. कांबळे यांनी प्रभावीपणे सूत्रसंचालन केले.  उपस्थित मान्यवरांचे स्वागत, कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करणे आणि सत्रांचे समन्वयन करणे ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.तसेच महाविद्यालयातील अकॅडेमीक इन्चार्ज डॉ. जी. एच. वाडकर यांनी सेमिनार बाबत आपलें मनोगत व्यक्त केले.कार्यशाळेच्या शेवटी सहभागींच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यशाळेने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक लेखनाबाबत जागरूकता निर्माण करून, संशोधन क्षेत्रातील नवनवीन संधी शोधण्यास प्रेरणा दिली, असे मत सहभागींकडून व्यक्त झाले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मोहिते याचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील ग्रंथालय कमिटी व लायब्ररी क्लब च्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .