संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात संविधान सन्मान बाईक रॅली उत्साहात संपन्न.
संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात "संविधान सन्मान बाईक" रॅली उत्साहात संपन्न.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराळा तालुक्याच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.संविधानाचा जागर व संविधानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शिराळा तालुक्यातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. संविधान वादी आणि संविधान प्रेमी सर्व उपासक आणि उपासिका विविध गावातून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
बिऊर येथून सुरुवात होत असताना विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रा. जोखे सर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केल्यानंतर रॅलीतील उपासक आणि उपासिकांना तेथील धम्म बांधवांनी सर्वांना मिठाई वाटप केले. उपवळे, तडवळे अंत्री, शिरशी मार्गे पाचुंब्री मध्ये रॅलीचे आगमन होताच प्रत्येक गावच्या उपासक आणि उपासिकांनी गावात स्वागत केले . तेथील गावच्या बार्टीच्या अधिकाऱ्यांनी संविधानाबद्दल खूप चांगली माहिती दिली. करमाळे, खेड, रेड, कापरी मार्गे रॅली इंग्रुळ मध्ये आल्यानंतर सर्व बांधवांनी रॅलीतील लोकांना अल्पोपहार देण्यात आला. मांगले, कंणदूर,पुनवत,या गावामध्ये रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले . सांगता समारोपासाठी रॅली रिळे या गावी आल्या बरोबर तेथील उपासकांनी मोठ्या जल्लोषात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रिळे गावचे उपासकांनी रॅली सह सर्वच समाज बांधवांना भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. संस्थेच्या वतीने रॅलीचे नियोजन करत असता जिल्हाध्यक्ष आयुष्यमान रवींद्र लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष आयु. जगन्नाथ परुले तालुका सरचिटणीस बौद्धाचार्य आयुष्यमान शशिकांत कांबळे,आयुष्यमान बाबासो कांबळे, यांनी उत्तम नियोजन केले संस्थेचे पदाधिकारी आयुष्यमान अशोक कांबळे, आयुष्यमान रमाकांत मोहिते, जगन्नाथ कांबळे, जालिंदर कांबळे, जगन्नाथ झाडे, अमोल कांबळे, गौतम कांबळे, दीपक कांबळे, नामदेव झिमुर तसेच रिळे ग्राम शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी रॅलीसाठी खूप मेहनत घेतली. या सर्व गावातून आलेल्या उपासक उपासिका यांचा सत्कार करण्यात आला.









Comments
Post a Comment