शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासमोर सर्वश्रेष्ठ आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा
शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यासमोर सर्वश्रेष्ठ आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा
______प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे
कराड - प्रतिनिधी.
7 नोव्हेंबर2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड सांस्कृतिक विभाग, एनएसएस व एनसीसी विभाग यांचे वतीने 7 नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन (विद्यार्थी दिवस) वंदे मातरम 150 वा वर्धापन दिन (समूह गान) उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या समोर सर्वश्रेष्ठ आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाच्या माध्यमातून धुळीतून धुरंदरांच्या यादीत बाबासाहेबांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. देश विदेशात ज्ञानार्जन करून स्वतःला सामाजिक कार्यात वाहून घेतले. शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा गुलामगिरीतील समाजाला संदेश दिला. समाजातील अनेक वाईट रूढी परंपरा कायद्याने बंद केल्या. अखंड भारताचे संविधान निर्माण होण्यात त्यांचा मोठा वाटा होता म्हणूनच ते संविधानाचे शिल्पकार ठरले. वर्ण वर्चस्वाने ग्रासलेल्या भारतीय जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता त्यांनी संविधानातून दिल्या. शिकलेला एक विद्यार्थी काय करू शकतो याची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण प्रवास पूर्ण करावा. म्हणजे नक्कीच त्या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व सर्वतोपरी घडून येईल. आज 150 वा वंदे मातरम वर्धापन दिन आहे त्याबद्दलही मी सर्वांना शुभेच्छा देतो!
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तसेच विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काव्यवाचन विद्यार्थी व प्राध्यापकांनी केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, एनसीसी विभाग प्रमुख प्रा. दीपक गुरव ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सुरेश यादव यांनी केले तर आभार डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment