कराड शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न.


कराड शहरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा  उत्साहात संपन्न.

कराड - प्रतिनिधी.

कराड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बाबुभाई पद्मसी हॉल, कराड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात कराड शहरातील विविध विभागांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्येच असते आणि आजच्या या मेळाव्यात तो आत्मविश्वास स्पष्ट दिसून आला. आगामी निवडणुकीत कराडचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांचे हित हेच केंद्रस्थानी राहील. आपल्या प्रत्येक बुथवर आपला झेंडा आणखी बळकट करण्यासाठी आपल्याला एकसंघपणे काम करायचं आहे. 

या मेळाव्यात आगामी नगराध्यक्ष निवडणुकीच्या प्रचार धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील संपर्क मोहिम, जनसंपर्क कार्यक्रम, आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर विचारमंथन झाले. आगामी निवडणुका या सत्तेसाठी नव्हे, तर सुशासन, पारदर्शकता आणि विकासाच्या राजकारणासाठी आहेत. कराडच्या जनतेचा विश्वास आणि प्रेम हेच सर्वात मोठे भांडवल आहे.

तसेच, कराड नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि सर्व ३० नगरसेवक भारतीय जनता पक्षाचेच असतील, यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असा ठराव बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्साह, बांधिलकी आणि संघटनशक्ती पाहून खात्री आहे की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष कराड शहरात भक्कम यश मिळवेल. 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .