सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .

 सोनवडे ग्रामपंचायतीला  आरोग्यविषयक कार्याचा विसर.

 शिराळा – प्रतिनिधी.

 ग्रामपंचायत ही संस्था गावाचा कारभार आणि विविध विकास योजना राबवित असेल तरच त्या गावाचा सर्वांगीण विकास होतो. सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने गाव कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायत कामकाज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये चालतो तसेच नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. या सगळ्या प्रक्रियातून जाऊन सोनवडे (ता.शिराळा) ग्रामपंचायत स्थापन झाली. पण या ग्रामपंचायतीला आपल्या कार्याचा विसर पडलेला दिसून येतो.

 कृषी पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते बांधणी, ग्रामोद्योग आणि सहकार प्रशासन या प्रमुख कार्यासाठी ग्रामपंचायत काम करणं अपेक्षित असतं परंतु सोनवडे गावातील आरोग्य आणि रस्ते बांधणी या कार्यासाठी दुर्लक्ष केलेले अढळून येते.

 जिल्हा परिषद शाळा सोनवडे ते तक्षशिला नगर  याकडे जाणारा ग्राम अंतर्गत रस्ता लोकांच्या रहदारीसाठी खुला आहे. पण तक्षशिला नगर  वस्तीतील सांडपाण्याची व्यवस्था दुर्लक्षित झाल्याचे आढळून येते, यामुळे रस्त्यावर गटारीचे पाणी येऊन लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आढळून येतो. त्याचबरोबर हे सर्व गटाराचे सांडपाणी जिल्हा परिषद शाळा सोनवडे (ता. शिराळा, जि. सांगली)  या शाळेच्या कमानी समोर येऊन जमा होते. मुलं शाळेत ये जा करताना त्या पाण्यातूनही येतात.मुलं त्या पाण्यात वावरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर त्यांना भविष्यात या कारणामुळे दुखापतीलाही सामोरे जावं लागू शकतं.  याबरोबरच  ग्रामस्थांनाही या रस्त्यावर येणाऱ्या गटारीच्या पाण्याचा  त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात त्यांना आरोग्याच्या समस्या यामुळे उद्भवू शकतात, त्याचबरोबर वृद्ध नागरिकांना रस्त्याने येजा करण्यात अडथळे निर्माण होतो त्यांनाही या समस्येमुळे दुखापतींना सामोरे जावे लागू शकतं. त्यामुळे ग्रामपंचायत सोनवडे (ता. शिराळा)  यांनी त्वरित या सांडपाण्याची व्यवस्था करावी व तक्षशिला नगर  वस्तीकडे जाणारा गावांतर्गत रस्ता या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सांडपाण्याची निचरा होण्या साठी गटाराची  व्यवस्था का निर्माण झाली नाही याचाही शोध घ्यावा. त्याचबरोबर विविध योजना अंतर्गत गटारांचं निर्माण व्हावे अशी अपेक्षा नागरिकांच्या कडून व्यक्त केली जात आहे.



 सोनवडे :- रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे नसल्याने सांडपाणी रस्त्यावर.


 सोनवडे :- रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नसल्याने सांडपाणी सोनवडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर रस्त्यावर.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.