डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला जनसागर.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  चैत्यभूमीवर उसळला जनसागर.

रिपब्लिकन समाज पक्ष (BRSP) तर्फे भव्य माहिती व प्रचार स्टॉल उभारून केलं अभिवादन.


मुंबई - प्रतिनिधी.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे महामानव क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुजन रिपब्लिकन समाज पक्ष (BRSP) तर्फे भव्य माहिती व प्रचार स्टॉल उभारण्यात आला.5 व 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून BRSP चे हितचिंतक, कार्यकर्ते, युवा व महिलांनी मोठ्या संख्येने भेट देत स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा उत्तरप्रदेश, कर्नाटक, हैदराबाद, दिल्ली, गुजरात, केरळ या राज्यांमधूनही पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व व आदरणीय ऍड. डॉ. सुरेश माने साहेबांचे निष्ठावंत समर्थक आवर्जून दादर येथे भेट देऊन आंदोलनाशी ऐक्य व्यक्त केले.महामानवांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, संघटन वाढीसाठी आणि बहुजन स्वाभिमान जागृतीसाठी BRSP कडून नेहमीप्रमाणे सातत्यपूर्ण कार्य सुरू राहील, असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले यांनी व्यक्त केला.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .