शिवसेना शाखा सूर्य नगर विक्रोळी मुंबई यांच्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सन्मान.

 शिवसेना शाखा सूर्य नगर विक्रोळी मुंबई यांच्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा सन्मान.

मुंबई - प्रतिनिधी.

 शिवसेना शाखा क्रमांक 120 सूर्य नगर विक्रोळी यांच्या वतीने दैनिक ललकार चे  कराड कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला, यावेळी शाखेचे शाखाप्रमुख निलेश पोहकर, शिवसेना शाखा संघटक उत्तमराव कुऱ्हाडे, निखिल गजरे ,संजय भालेकर, मल्हारी कवितके, अक्षय पाटील ,उमेश शेवाळे, दत्तात्रय पवार यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी बोलताना कुऱ्हाडे म्हणाले की पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे सातारा जिल्हा सह कराड तालुक्यामध्ये त्यांनी आपल्या पत्रकारिता या क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे , प्रशासकीय क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे उत्तम संघटन कौशल्य, सकारात्मक पत्रकारिता त्यामुळे जनमानसात त्यांचे नवलौकिक आहे त्यांच्या या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .