महिला महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.
महिला महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.
महिला महाविद्यालय, कराड येथे दिनांक 25 नोव्हेंबर, 2025 रोजी ए.डी . श्राॅफ वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींचा सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. भरत बल्लाळ हे अध्यक्षस्थानी होते . त्यांनी अध्यक्षीय भाषणत ए.डी.श्राॅफ यांची भारताच्या आर्थिक जडघडण मधील महत्वाची भूमिकेचा उलघडा विद्यार्थ्यांसमोर केला .विशेष उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोनटक्के उपस्थित होते . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून इंग्रजी विभागाच्या प्रो.( डॉ.) उज्वला ताठे मॅडम तसेच वाणिज्य विभागाचे प्रा. किशोर गुजर ,अर्थशास्त्र विभागाचे प्रा. विनोद सागरे उपस्थित होते . या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस रूपये 2500/ हजार व प्रमाणपत्र कु.समीक्षा थोरात बी.ए.भाग- 2 यांनी प्राप्त केले.तर द्वितीय बक्षीस रूपये1500/ हजार व प्रमाणपत्र कु.स्नेहा भरमगौडा बी.ए.भाग - 3 मधील विद्यार्थीने प्राप्त केले. तृतीय बक्षीस रुपये 1000/हजार व प्रमाणपत्र कु. वैष्णवी कदम बी.ए. भाग 2 मधील विद्यार्थिनींनी प्राप्त केले. ही स्पर्धा महाविद्यालयाच्या निबंध व वक्तृत्व समितीच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे प्रास्ताविक प्रा. भक्ती भालदारे, व आभार प्रदर्शनाचे कार्य प्रा. कांचन थोरात तर सूत्रसंचालन प्रा. रुपाली भोसले यांनी केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग तथा सेवकेत्तर वर्ग उपस्थित होता.


Comments
Post a Comment