कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे आर्ट ॲन्ड सायन्स ऑफ टॅबलेट फॉरम्युलेशन डेव्हलपमेंट या विषयावरती सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी नोवारटीस हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे असोसिएटेड डायरेक्टर अभय वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी टॅबलेट फॉरम्युलेशन कसे होते, टॅबलेटचे प्रकार किती आहेत, त्यांचे महत्त्व काय आहे तसेच टॅबलेट फॉरम्युलेशनचे कला आणि विज्ञान म्हणजे गोळ्या तयार करण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये औषधे आणि योग्य सहाय्यक वापरून त्यांची योग्य घन मात्रा कशी तयार केली जाते याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

Comments
Post a Comment