Posts

आदर्श शिक्षक हंबीरराव कांबळे यांना अनोखी श्रद्धांजली.

Image
  आदर्श शिक्षक हंबीरराव कांबळे यांना अनोखी श्रद्धांजली. पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासह २०० पुस्तकांचे वाटप शिराळा- प्रतिनिधी.  मांगले ता.शिराळा  गावचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते हंबीरराव शंकर कांबळे (वय ८३) यांचे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.हंबीरराव कांबळे यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून वह्या, पुस्तके आणि कपडे उपलब्ध करून दिले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांसाठी कोणताही मोबदला न घेता अतिरिक्त मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय विभागांमध्ये क्लास-१ व क्लास-२ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळवून आपल्या गावाचा गौरव वाढविला.त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा स...

कोडोली प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

Image
  कोडोली प्रशालेत पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न कार्वे - प्रतिनिधी.   भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली  प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ मधील पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.संभाजी पाटील नाना होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कांबळे के.टी सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी पालकसभेचे उद्दिष्ट, पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शाळा व पालक यांची  महत्वपूर्ण भूमिका याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर सौ. जगताप एल. एम मॅडम यांनी  पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, परस्पर विश्वास आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये पालकांच्या भूमिकेचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विशद केले. बदलत्या व तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्ये आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची सांगड घालत स्वतःला सक्षम बनविण्याची आवश्यकता त्यां...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे चालू शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदित्यमान यशाचे कौतुक करण्यासाठी व अभ्यासक्रमातील येणाऱ्या अडचणी सोडवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवून त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू  देऊन गौरवण्यात आले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फळ असून केवळ गुण मिळवणे म्हणजे शिक्षण नसून, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करणे हेच खरे यश असल्याचे सांगितले व पुढील येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी कशी तयारी करावी हे सांगून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली...
Image
  आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी. कराड - प्रतिनिधी.  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 27 या परिसंवादात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती डॉ. मारुती सूर्यवंशी  कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलताना, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी - म्हणाले की, या अर्थसंकल्पामध्ये सरकारने विशेष करून संरक्षणावरती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे व देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलेली दिसून येते. तसेच अधिक रोजगार निर्मिती व्हावी ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरिता सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रु. ची सरकारने तरतूद केलेली दिसून येते. थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आर्थिक विकासाची गती...

कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन. उंडाळे - प्रतिनिधी. श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव  महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वतीने क्रिएटिव्ह आर्ट वर्कशॉप या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या व्यवस्थेतून वेळ काढून आपल्या मनातील कल्पनाशक्तीला वाट मोकळी करून देणे हा होता. म्हणूनच संस्थेच्या सर्व शाखेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी चित्रकार अमृता डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन केले होते.  यावेळी त्यांच्याकडून सोप्या पद्धतीने चित्रकला शिकवण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या ...

नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त

Image
  नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त_____ प्रो.डॉ.अजितकुमार जाधव.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण व इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने व संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख साधन व्यक्ती म्हणून आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे चे इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. अजितकुमार जाधव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजविण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. अनेक संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. पुरावे लेखागारात असलेली माहिती प्रचंड प्रमाणात डिजिटल स्वरूपात मिळत आहे. मोठ्या माहितीचे विश्लेषण, नकाशे विश्लेषण, प्राचीन व्यापारी मार्ग नकाशाच्या साह्याने शोधणे, डिजिटल स्वरूप...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तसेच सध्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर धांगेकर(हॉस्पिटल फार्मासिस्ट), परेश बगुल(असिस्टंट प्रोफेसर रुपेश बंधन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर), सागर मोहिते(हॉस्पिटल फार्मासिस्ट) व अभिजीत दळवी(एरिया सेल्स मॅनेजर दवा इंडिया प्रायव्हेट लि.) हे उपस्थित होते. यावेळी परेश बगुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी इतर कोणत्याही वाईट गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासात लक्ष देणे, तसेच स्वतःचे करिअर हे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून फक्त डिप्लोमा फार्मसी न करता पुढील शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच औदुंबर धांगेकर, सागर मोहिते व अभिजीत दळवी यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या ते काम करत असलेल्या क्षेत...