कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

 कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव येथे कार्यशाळेचे आयोजन.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) घोगाव  महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वतीने क्रिएटिव्ह आर्ट वर्कशॉप या एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या व्यवस्थेतून वेळ काढून आपल्या मनातील कल्पनाशक्तीला वाट मोकळी करून देणे हा होता. म्हणूनच संस्थेच्या सर्व शाखेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी चित्रकार अमृता डोके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन केले होते.  यावेळी त्यांच्याकडून सोप्या पद्धतीने चित्रकला शिकवण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या कार्यक्रमावेळी संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. रामलिंग पत्रकार, इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पा पाटील व श्री संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या मनीषा हरळीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी कर्मचाऱ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे व संस्थेमधील सर्व महाविद्यालयामधील वातावरण अधिक सकारात्मक व सुसंवादी बनवणे व कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवून कामातील ताण-तणाव कमी करणे हा उद्देश असल्याचे सांगितले. 

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या हस्ते चित्रकार अमृता डोके, सचिव प्रसून जोहरी, प्राजक्ता जोहरी व सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे  स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोनिका शिंदे व आभार प्रा. प्रियांका माळी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .