शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धेत उज्वल यश.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे विविध स्पर्धेत उज्वल यश.
कराड - प्रतिनिधी.
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड च्या विद्यार्थ्यांनी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आयोजित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धे अंतर्गत, विभागीय स्पर्धा 2026 मध्ये उज्वल यश संपादन केले. या सर्वांचे कराड व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे, येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन गटात किरण महादेव कोळी बीए भाग तीन (भूगोल) याचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत अरविंद रामचंद्र लोंढे बीए भाग तीन (हिंदी)याचा द्वितीय क्रमांक आला. मृणाली सचिन पाटील बारावी (कला) हिचा चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आला. महाविद्यालयाच्या समूहगीत संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व स्पर्धकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव मा. सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन, प्राचार्य सिताराम गवळी, सहसचिव अर्थ, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे यांनी या सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
विवेकानंद जयंती सप्ताह 2026 शाखास्तरीय स्पर्धातून गुरुदेव कार्यकर्ता गट व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली होती. गुरुदेव कार्यकर्ता गटातून विविध स्पर्धेत डॉ. स्वाती मोरकळ, प्रा.प्रियांका मदने, प्रा. सुषमा चंदुगडे, डॉ. आशा सावंत, प्रा.धनराज घुबडे, प्रा. तेजस्विनी दळे, डॉ. गोरख गायकवाड, श्रीमती सेन, प्रा.अभिजीत दळवी, प्रा. सोमनाथ पाटील तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी शाखास्तरीय व विभागीय स्पर्धेत सहभाग घेतला.
या सर्व स्पर्धांचे प्रमुख समन्वयक म्हणून वरिष्ठ विभागाच्या वतीने डॉ. सुभाष कांबळे, प्रा. विश्वनाथ सुतार, कनिष्ठ विभागाच्या वतीने प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. सुरेश यादव यांनी काम पाहिले. स्पर्धा सह समन्वयक म्हणून प्रा. विनायक जाधव, प्रा. मनाली रानडे, प्रा. शैला चौबे, प्रा. एस. के. कालभूषण, प्रा. युवराज पाटील, प्रा. तेजस्विनी दळे, डॉ. आशा सावंत, डॉ.मारुती सूर्यवंशी, डॉ. गोरख गायकवाड, प्रा. दिपाली वाघमारे, डॉ. शितल गायकवाड, प्रा. सुरेश रजपूत, प्रा. जीवन अंबुडारे यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये सहकार्य केले.

Comments
Post a Comment