कुटुंबवत्सल, त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातून यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वास उभारी_____डॉ. भारती पाटील.

कुटुंबवत्सल, त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातून यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वास उभारी_____डॉ. भारती पाटील.

कराड - प्रतिनिधी. 

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे स्वर्गीय वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते म्हणून मा. डॉ. भारती पाटील (कोल्हापूर) होत्या. आपल्या मार्गदर्शनात त्या म्हणाल्या, कुटुंब वत्सल त्यागमूर्ती वेणूताईंच्या समर्पनातूनच यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वास उभारी मिळाली. वेणूताई चव्हाण म्हणजे अप्रतिम त्यागाचे आणि कुटुंब वत्सल स्त्रीचे अत्यंत महान उदाहरण आहे. वडील बडोदा संस्थानाच्या मुंबईतील बंगल्याचे कारभारी होते. त्यामुळे वेणूताईंचे बालपण अत्यंत सुखात, आनंदात होते. संस्थानाच्या परिसरात त्यांचा वावर असल्यामुळे परिपूर्ण सभ्यता त्यांच्या संस्कारात होती. देशात स्वातंत्र्य चळवळ शिगेला पोहोचलेली होती. त्या वातावरणात त्यांचा विवाह यशवंतराव चव्हाण यांच्याशी झाला. यशवंतरावांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा वातावरणात ही वेणुताई रमल्या. यशवंतराव भूमिगत चळवळीत असल्याने लग्न झाल्यानंतर सहा महिन्यात वेणूताईंना दोन महिने तुरुंगवासात राहावे लागले. पुढे यशवंतराव मंत्री झाले. मुख्यमंत्री झाले. देशाचे संरक्षण मंत्री झाले . विविध पदे त्यांना मिळाली परंतु राष्ट्राच्या संपत्तीचा कोणताही गैरवापर पती-पत्नीकडून झाला नाही. आजच्या राजकीय पुढार्‍यांची तुलना केली तर यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण किती महान होत्या हे समजते. वेणूताईंच्या आयुष्याची 20, 21 वर्षे दिल्लीमध्ये गेली. त्या यशवंतरावांच्या सचिव होत्या. त्यांनी विटा मातांच्या ओव्या त्या काळात प्रसिद्ध केल्या. अनेक नातेवाईकांची मुले, नातेवाईक, कर्मचारी यांना आपली मुले समजून सांभाळ केला. यशवंतरावांच्या आयुष्यातील अनेक चढउतारांच्या काळात वेणूताई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. दुसऱ्याविषयी अत्यंत कळवळा असलेल्या वेणूताईंच्या वरती यशवंतरावांचे ही तितकेच प्रेम होते . यशवंतरावांनी म्हटले आहे, वेणूताई माझा श्वास आहे तर चळवळ माझे ह्रदय आहे. कृष्णाकाठ हे यशवंतरावांचे आत्मचरित्र वेणूताईंना समर्पित केलेले आहे वेणूताईंच्या निधनानंतर यशवंतरावांचेही एक दीड वर्षांमध्ये निधन झाले यावरूनच या पती-पत्नींची एकरूपता दिसून येते. आज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मी स्वर्गीय वेणुताईंना वंदन करते.

                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, देशाच्या संरक्षण मंत्र्यांची पत्नी असून देखील वेणूताईंचा जीवनपट साधी राहणी व उच्च विचार होता. त्या उत्तम गृहिणी, उत्तम सहचारिणी, प्रचंड उंचीच्या मानवता जपणाऱ्या होत्या. यशवंतराव आयुष्याच्या खूप मोठ्या उंची वरती पोहोचले. वेणूताई चव्हाण सावली सारख्या त्यांच्या पाठीशी होत्या.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रियांका मदने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विनायक जाधव यांनी केला. आभार प्रा. सुरेश यादव यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ.आशा सावंत यांनी केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुभाष कांबळे, प्रा. सुरेश यादव, डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा. रघुनाथ गवळी प्रा. सचिन बोलाईकर, प्रा. संभाजी पाटील प्रा. सविता येवले प्रा. डॉ. स्वाती मोरकळ, प्रा. डॉ. शितल गायकवाड, विद्यार्थी, विद्यार्थिनी सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .