आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी.
आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी.
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 27 या परिसंवादात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती डॉ. मारुती सूर्यवंशी कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलताना, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी -
म्हणाले की, या अर्थसंकल्पामध्ये सरकारने विशेष करून संरक्षणावरती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे व देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलेली दिसून येते. तसेच अधिक रोजगार निर्मिती व्हावी ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरिता सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रु. ची सरकारने तरतूद केलेली दिसून येते. थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आर्थिक विकासाची गती वाढवणे व ती टिकवणे याकडे लक्ष दिल्याचे दिसून येते.
परिसंवादात आपले विचार व्यक्त करताना प्रा. संदीप तुपे म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये सरकारला मिळणारे संभाव्य उत्पन्न व सरकारच होणारा संभाव्य खर्च याविषयीचे मार्गदर्शन तसेच रुपया कसा येतो रूपया कसा जातो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
परिसंवादात बोलताना,डॉ. सारिका लाटवडे म्हणाल्या, -याअर्थसंकल्पामध्ये आरोग्य विषयक तरतुदी काय आहेत याविषयी मार्गदर्शन केले आहे.या परिसंवादात कृषी क्षेत्राविषयी बोलताना प्रा. जयदीप चव्हाण- म्हणाले या अर्थसंकल्पामध्ये सरकारने कृषी क्षेत्रासाठी केलेल्या सर्व तरतुदी विषयी विश्लेषण केले आह.वाणिज्य विभाग प्रमुख व परिसंवादाच्या साधन व्यक्ती डॉ. आशा सावंत म्हणाल्या,या अर्थसंकल्पामध्ये महिला विषयक तरतुदी मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा, SHE मार्ट, तसेच इतर तरतुदी विषयी मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आर्थिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी विषयी अचूक ज्ञान प्राप्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कारण यावरूनच देशाची आर्थिक स्थिती आपल्याला समजून येते. येणाऱ्या आर्थिक वर्षात कृषी, आरोग्य विज्ञान, शिक्षण, औद्योगीकरण, दळणवळण, जलसंपत्ती, खनिज संपत्ती, इत्यादी विविध घटकांच्या वरती अर्थसंकल्पाचा प्रभाव पडत असतो. तेव्हा अर्थसंकल्पाविषयीची माहिती घ्यावी. परिसंवादाच्या निमित्ताने अर्थशास्त्र विभागाच्या वतीने अर्थसंकल्पावरती आधारित भित्तिपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे सर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रा. ज्योती धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये प्रश्नोत्तरांच्या चर्चेत प्रा.सचिन बोलाईकर, प्रा. सोमनाथ पाटील, प्रा. युवराज कापसे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment