नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त

 नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजवण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान उपयुक्त_____ प्रो.डॉ.अजितकुमार जाधव.

 कराड - प्रतिनिधी.  

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण व इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर: आव्हाने व संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख साधन व्यक्ती म्हणून आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज नागठाणे चे इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. अजितकुमार जाधव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्यात आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन रुजविण्यासाठी इतिहास विषयात ए. आय. तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. अनेक संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. पुरावे लेखागारात असलेली माहिती प्रचंड प्रमाणात डिजिटल स्वरूपात मिळत आहे. मोठ्या माहितीचे विश्लेषण, नकाशे विश्लेषण, प्राचीन व्यापारी मार्ग नकाशाच्या साह्याने शोधणे, डिजिटल स्वरूपात संपूर्ण जगाची अभ्यास सहल, आभासी स्वरूपात करता येते. ऐतिहासिक स्थळे शोधता येतील. अध्यापनात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांची थ्रीडी मॉडेल उपलब्ध होतील. विविध भाषेतील ऐतिहासिक दस्तऐवज हव्या त्या भाषेत उपलब्ध होतील. या संधी बरोबर काही आव्हाने देखील समोर आहेत. त्यामध्ये उपलब्ध माहितीची अचूकता, बेकारी वाढू शकते. मानवातील क्रियाशीलता कमी होऊन आळशीपणा वाढू शकतो. गैरवापराने धार्मिक व जातीयवादाचे समस्या निर्माण होऊ शकतात. सकारात्मक विचाराने या तंत्रज्ञानाचा वापर करावा असे या कार्यशाळेच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो.

                  अग्रणी विभागाच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्ष मार्गदर्शनात ते म्हणाले, ए.आय. तंत्रज्ञान मानवाने तयार केलेले आहे. इंटरनेटवरील माहिती पोहोचवण्याचे ते प्रमुख साधन आहे. येणाऱ्या काळात संशोधनासाठी  या तंत्रज्ञानाचा वापर खूप महत्त्वाचा आहे.

            या कार्यशाळेसाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. सचिन बोलाईकर यांनी केले. साधन व्यक्तींचा परिचय प्रा. युवराज कापसे यांनी केला. आभार आग्रणी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले.  सूत्रसंचालन प्रा. शितल उबाळे यांनी केले

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .