येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप.
येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.
उंडाळे - प्रतिनिधी.
येळगाव जिल्हा परिषद गटातील घोगाव या ठिकाणी कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ.अतुल बाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली येळगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, नेते, बूथ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्य वस्तूंचा संच वाटप याचा भव्य असा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये विविध लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेतून इसेन्शियल किट (पेठी) व सेफ्टी किट (बॅग) वाटप करण्यात आले. येळगाव जिल्हा परिषद मधील 1000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी येळगाव जिल्हा परिषद गटातील ऍड.मा.बाळासाहेब पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, येळगाव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.अक्षय शेटे, सहकारमहर्षी स्व.जयवंतराव भोसले पतसंस्था संचालक मा.हणमंतराव थोरात, मनव उपसरपंच मा.दादासो शेवाळे, घोगाव उपसरपंच मा.निवास शेवाळे, मा.बाजीराव शेठे (सर), मा.योगेश पाटील, जिंती पोलीस पाटील मा.संतोष पाटील, म्हसोली माजी सरपंच मा.दिनकर पाटील, जिंती माजी उपसरपंच मा.जयवंत शेवाळे, मा.अशोक पाटील, मा.मारुती शेवाळे, महारुगडेवाडी उपसरपंच मा.अजित महारुगडे, मा.वसीम मुल्ला, मा.उत्तम देऊंगळे, मा.संदीप भावके, मा.जयकर पाटील, मा.भानुदास माटेकर, मा.सुरेश मोहिते, मा.सुमित शेवाळे, मा.वसंत वाळके, मा.बाबासो धुमाळ, मा.अक्षय काटेकर, मा.रवींद्र सपकाळ, मा.वैभव जाधव व सर्व येळगाव जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, भाजपा बुथ अध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comments
Post a Comment