कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणी अभ्यास क्षेत्र भेटी.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध ठिकाणी अभ्यास क्षेत्र भेटी.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता विविध ठिकाणांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जलशुद्धीकरण प्रकल्प व सुमन मेडिकल मलकापूर (कराड) या ठिकाणी भेटींचे आयोजन करण्यात आले होते. फार्मसीमधील सोशल फार्मसी व फार्माकोग्नसी या विषयातील फार्मसीच्या अभ्यासक्रमांतर्गत या भेटी देण्यात आल्या होत्या.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्स इन्चार्ज प्रा. पूजा भोसले व प्रा. तेजस्वी कांबळे यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या भेटीचे आयोजन केले होते.या भेटीवेळी विद्यार्थ्यांसमवेत प्रा. पूजा भोसले, प्रा. तेजस्वी कांबळे, लॅब टेक्निशियन साधना सलगर हे उपस्थित होते.

Comments
Post a Comment