वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव 'चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव 'चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. १७/१२/२०१५ रोजीउ त्साहात संपन्न झाला. या समारंभासाठी प्रमुख अतिथी सौ. शोभा संजय भोसले मॅडम होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष व शिराळा पंचायत समिती माजी सभापती मा-चंद्रकांतदादा पाटील (भाऊ) हे होते. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे संचालक श्री. गजानन पाटील, सागांवचे माजी उपसरंपच व शिराळा भाजपा ग्रामीण अध्यक्ष मा. सत्यजीत पाटील (भैय्या), माजी मुख्याध्यापक श्री.ए. आर. पाटील सर, संजय काशीनाथ भोसले साहेब, लक्ष्मीकांत भोसले ,श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक समिती अध्यक्ष व सदस्य विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी, पत्रकार पालक, विद्यार्थी उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभ स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.सी. सदावर्ते सर यांनी केले. अहवाल वाचन सौ.ए. आर. पाटील (साळुंखे) मॅडम यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री.व्ही.डी. पाटील सर यांनी करून दिली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील भाऊ यांचे मातोश्री शांतालाई दादा पाटील याच्या स्मरणार्थ कला रत्न पुरस्कार इ.१२ वी तील कु. पायल राजू सोयटेल, खेलरत्न पुरस्कार इ.१० वीतील प्रतिक भास्कर शिंदे यास तर आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार इ.१० वी तील कु. वैष्णवी शरद पवार हिला देण्यात आला.तसेच संस्थेचे संचालक बाळकृष्ण दत्तात्रय शेटे यांच्या मातोश्री शांताबाई दत्तात्रय शेटे यांचे स्मरणार्थ इ.५वी ते१२ वीतील वर्गातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.त्याचप्रमाणे स्व.बाबुराव दादा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भैरवनाथ विविध संध्यामार्फत दिला जाणारा आदर्श सेवक पुरस्कार. विद्यालयातील सेवक श्री. शिवाजी थोडी झाडे यांना देण्यात आला.तसेच विद्यालयामार्फत विविध स्पर्धाती यशस्वी विद्यार्थ्यांना मा. सौ. शोभा संजय भोसले यांच्या हस्ते प्रशस्त्रीपत्र देवून गौरव करण्यात आला.विद्यालयातील पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने विद्यालयातील सौ. संगीता अंकुश पाटील मॅडम व अंकुश धोंडीराम पाटील आणि श्री. सुभाष ज्ञानू जमदाडे व सबिता सुभाष जमदाडे उभय पती-पत्नीचा विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती सत्कार करण्यात आला .उभय सत्कार मूर्तीनी विद्यालयातील गतस्मृतींना उजाळा देऊन विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.याप्रसंगी कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या सौ-शोभा संजय भोसले मॅडम यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी आदर्श गुण संपादित करा, उद्योजक बना, स्वतःचे, आईवडिलांचे,शाळेचे , आणि देशाची सेवा करा. स्वतःपुरते वैयक्तिक जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जगा असा मौलिक संदेश दिला.तसेच माजी उपसरपंच मा. सत्यजित पाटील (भैय्या)यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विद्यार्थी विकासात विद्यालयातील शिक्षकांचे योगदान यांची मुक्तकंठाने स्तुती केली.वि द्यालयाच्या प्रगतीत सातत्याने भर पडावी असा संदेश दिला पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.श्री. बी.एम. नलवडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. एस.एच् इंगवले सर यांनी केले.या कार्यक्रमाला मोठ्या संस्थेने विद्यार्थी व पालक, नागरिक उपस्थित होते.






Comments
Post a Comment