संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात भव्य बाईक रॅली.

 संविधान दिनानिमित्त शिराळा तालुक्यात भव्य बाईक रॅली.

 शिराळा- प्रतिनिधी. (नानासाहेब कांबळे.)

संविधान दिनानिमित्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शिराळा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाचा सन्मान व संविधानाचा जागर करण्यासाठी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधान दिनाच्या बाईक रॅली ची सुरुवात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजता बिऊर येथून सुरुवात होईल. या संविधान बाईक रॅलीचा मार्ग बिऊर, तडवळे, अंत्री, शिरशी, गिरजवडे, पाचुंब्री, बांबवडे, करमाळे, खेड, रेड, कापरी, इंग्रुळ, मांगले, कांदे,चिखली, नाटोली, सा गाव, कणदूर, पुनवत, फुपीरे, शिराळा खुर्द व रिळे या मार्गे जाणार आहे. या भव्य  संविधान बाईक रॅलीचा सांगता समारंभ रिळे येथे होणार आहे.

 या भव्य संविधान बाईक रॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शिराळा तालुका व सर्व संविधान प्रेमी भारतीय नागरिक यांचे सहकार्य होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .