विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन.
विद्यार्थ्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन____ प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे.
13 नोव्हेंबर 2025 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 59 व्या ए डी श्रॉफ स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्यातं आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वक्तृत्व कला हेच प्रभावी साधन आहे. महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने वक्तृत्व कलेची जोड जोपासली तर नक्कीच त्यांचे व्यक्तिमत्व भविष्यात फुलणार आहे. अशा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या सभाधिटपणा येतो. स्वतःचे विचार इतरांसमोर चांगल्या पद्धतीने कसे मांडावे. याचा अनुभव या स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय येत नाही. अशा स्पर्धेतूनच महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गृहमंत्री नामदार आर. आर. पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्व घडले. नामदार लक्ष्मणराव ढोबळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्रा. आ. ह. साळुंखे, प्रा. बाबुराव गुरव, प्रा. नितीन बानुगडे पाटील, कवी अनंत राऊत अशी एक ना दोन शेकडो व्यक्तिमत्व केवळ वक्तृत्व कलेमुळेच जगासमोर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या तसेच इतर महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यावा व आपल्या चांगल्या भविष्यासाठी वक्तृत्व कलेचे संगोपन करावे. दरवर्षी दरवर्षी ए. डी. श्रॉफ स्पर्धा आयोजित केली जाते. यामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात त्यांना प्रमाणपत्र व आर्थिक स्वरूपात बक्षीस मिळते याचा लाभ घ्यावा. या स्पर्धेचे उद्घाटन झाले. असे मी जाहीर करतो!
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुभाष कांबळे, प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. ज्योती धर्माधिकारी होते. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. सुरेश रजपूत, प्रा. संभाजी पाटील, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्पर्धक व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक या स्पर्धेचे प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले. आभार प्रा. रत्नाकर कोळी यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले.

Comments
Post a Comment