उंडाळे महाविद्यालयात औषध उपचार व धोके याविषयी व्याख्यानाचे आयोजन

 उंडाळे महाविद्यालयात औषध उपचार व धोके याविषयी व्याख्यानाचे आयोजन

         उंडाळे - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. वैशाली पाटील

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाने राज्य फार्मसी परिषद व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आलेल्या औषध सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी 

स्वा.  दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंडाळे येथील विद्यार्थ्यांना औषधोपचार आणि  धोके याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना औषधांचा वापर कसा करावा, चुकीची औषधे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, घरात पूर्वी उरलेली औषधे किंवा दुसऱ्यांची उरलेली औषधे घेऊ नये, डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, औषधे कोणत्या ठिकाणी ठेवावी व चांगल्या नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावीत व त्यावरील एक्सपायरी डेट पहावी व ते किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूनच ते औषध घ्यावे असे सांगितले. यावेळी  विद्यार्थ्यांना मेडिकलमधीलच औषधे घेण्यासाठी व औषधांचा योग्य वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली. 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .