राज्यात प्रथमच ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार प्राचार्य आणि संस्था अध्यक्षाला जेलची हवा,आणि आर्थिक दंड.
राज्यात प्रथमच ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार प्राचार्य आणि संस्था अध्यक्षाला जेलची हवा,आणि आर्थिक दंड.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट.
सविस्तर हकीकत अशी कि,मुंबई चेंबूर येथे श्री नारायण गुरु वाणिज्य महाविद्यालय आहे. तेथील प्राचार्य श्री. रवींद्रण कर्थाडी आणि संस्था अध्यक्ष श्री. एम. आय. दामोदरण, वरिष्ठ प्राध्यापिका सौं. जयश्री व्यकणटाचलम हे जाणीवपूर्वक मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, ओबीसी, आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांकडून दरवर्षी महाविद्यालत प्रथम वर्ष प्रवेशावेळी शासनाने (FRA)ठरवून दिलेल्या शुल्क्का व्यतिरिक्त, कैक पटीने जास्तीची फीस आकारून विद्यार्थी पालक यांचे शोषण करीत असे. तसेच मागासवर्गीय विदयार्थी यांच्या साठी (Sc, St, obc, miniority )केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या कडून आलेला निधी वर नमूद प्राचार्य, रवींद्रण कर्थाडी, एम. आय. दामोदरण आणि prof. जयश्री व्यँकटाचलम हे हडप करीत असे तसेच या तिघांनी पैसे कमविण्याची अजून एक शक्कल लढविली बारावी पास विद्यार्थी जे प्रथम वर्ष, बी. कॉम. साठी नियमांनुसार, मेरिट लिस्ट मधून पात्र असत त्यांना जबरदस्तीने add -on सर्टिफिकेट कोर्स च्या नावा खाली विद्यार्थना नको असलेला त्यांची इच्छा नसलेला विषय घायची सक्ती करून त्यांच्या कडून पैसे उकळत असत, त्याच महाविद्यालयात प्रो.अनंत कदम हे 2002 पासून सेवेत आहेत, त्यांना हे सर्व आवडत नसे, त्यांनी दरवर्षी या विरोधात महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे विश्वस्त या सर्वाना LMC आणि इतर मीटिंग वेळी विनंती करून विद्यार्थ्याकडून नियमबाह्य पैसे घेऊ नये अशी विनंती करायचे पन नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना गप्प बसविल्या जाई. श्री. नारायण गुरु वाणिज्य महाविद्यालयच्या परिसरात मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठाच्या 1978 च्या नामांतर लढ्यातील जालना, औरंगाबाद, बुलढाणा या जिल्ह्यातील आत्याचर ग्रस्त, पीडित ज्यांचे घर दार जाळून संसाराची राखरांगोळी केली अशी बौद्ध कुटुंबे आपले जीव वाचविण्यासाठी मुंबईच्या चेंबूर भागात स्थलांतरित झाली, या कुटुंबाची मुले मुली हे महाविद्यालय जवळ असल्यामुळे येथे प्रवेश घेत असत, सदरचा परिसर झोपडपटी परिसर असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकटच होती, 2012 या वर्षी प्रा.अनंत कदम यांनी या विरोधात विद्यापीठ स्तरावर आवाज उठवला, विद्यापीठाणे सदरच्या महाविद्यालयाला विद्यार्थना कडून अशा प्रकारची कोनतीही फीस आकारू नये, त्यांचे गुणपत्रिका अडवून ठेवू नये असा आदेश दिला. या गोष्टीचा आकस मनात ठेवून महाविद्यालयातील वर नमूद भ्रष्ट, लोभी तिकडी प्रा. अनंत कदम याचा विविध मार्गाने छळ करून त्यांचेवर जातीगत अत्याचार करण्यास सुरवात केली, यास न डगमगता निर्भीडपने प्रा. कदम यांनी रीतसरपने गुन्हा नोंद करून प्राचार्य आणि संस्था अध्यक्षाला जेलची हवा आणि दंड आकारण्या पर्यंत केस लढवून आरोपीच्या धमकी, अमिषाला बळी न पडता गुन्हेगाराला सजा मिळेपर्यत प्रकरण लावून धरले आणि गुन्हेगाराला शिक्षा देऊ केली, याबदल मुंबई शहरातील शिक्षण क्षेत्रात हा विषय सर्वत्र चर्चीला जातं आहे. प्रा. कदम हे तेथेच नौकरी करुंन आपल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढा उभारून त्यांना न्याय दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, आंबेडकर वाद हा नुसता न सांगता प्रत्यक्ष कसा अमलात आणला जातो याच हे एक मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे. चांगल्या हुद्यावर पोहचल्या नंतर समाजाला विसरण्याच्या काळात प्रा. कदम यांनी समाजातील विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. जिथे आहात तेथील आपल्या लोकांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी बाबासाहेबानी दिलेला मंत्र विसरू नका असा एक संदेश प्रा. कदम यांनी समाजासमोर ठेवल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनानी त्यांचे कौतुक केले.. सदरची केस मुंबई सत्र न्यायालयात sc /st spl case 05 of 2013 होती सदरील केसचा निकाल दि. 04/11/2025 रोजी जाहीर करण्यात आला. तसेच मुंबई विद्यापीठ येथील ट्रीब्युनल मध्ये देखील केस नंबर 03 of 2016 ही केस देखील जिंकून वर नमूद तिघांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला.. विशेष बाब म्हणजे नेहमी प्रमाणे सरकारी वकील आरोपीना मदत करणारी भूमिका घेबून त्यांना मदत केलेली असताना देखील प्रा. कदम यांनी आपण स्वतःच या sc /st प्रकरणात युक्तिवाद करून केस लढली आणि गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत न डगमगता अत्याचारा विरोधात ठाम पणे उभे राहिले.

Comments
Post a Comment