येळगाव महाविद्यालयात औषधांचा वापर कसा करावा याविषयी व्याख्यानाचे आयोजन
येळगाव महाविद्यालयात औषधांचा वापर कसा करावा याविषयी व्याख्यानाचे आयोजन
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव या महाविद्यालयाने राज्य फार्मसी परिषद व ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या संयुक्त प्रयत्नाने घेण्यात आलेल्या औषध सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येळगाव येथील विद्यार्थ्यांना औषधोपचार आणि धोके याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना औषधांचा वापर कसा करावा, चुकीची औषधे घेतल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, घरात पूर्वी उरलेली औषधे किंवा दुसऱ्यांची उरलेली औषधे घेऊ नये, डॉक्टरांच्या किंवा फार्मासिस्ट यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, औषधे कोणत्या ठिकाणी ठेवावी व चांगल्या नामांकित कंपनीचीच औषधे घ्यावीत व त्यावरील एक्सपायरी डेट पहावी व ते किती प्रमाणात घ्यायचे आहे ते पाहूनच ते औषध घ्यावे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना मेडिकलमधीलच औषधे घेण्यासाठी व औषधांचा योग्य वापर करण्यासाठी शपथ देण्यात आली.

Comments
Post a Comment