बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन
बी. आर.एस. पी. चे चेंबूर येथे आंदोलन.
मुंबई- प्रतिनिधी.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ( BRSP ) संस्थापक अध्यक्ष ऍड डॉ सुरेश माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई प्रदेश अध्यक्ष दिपक चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी चेंबूर विभागातील वॉर्ड क्रमांक 150 आणि 152 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या, शौचालय, वाढते प्रदूषण आणि मनपाच्या दुर्लक्षाबाबत एम वेस्ट मनपा कार्यालयावर घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले.आंदोलन होण्यापूर्वीच सहाय्यक आयुक्त यांनी एक दिवस पूर्वी संपर्क करून BRSP प्रतिनिधींना भेटीसाठी निमंत्रित केले. त्या भेटीदरम्यान पक्षाच्या प्रतिनिधींनी वॉर्ड मधील विविध समस्या सविस्तरपणे मांडल्या. सहाय्यक आयुक्तांनी आपल्या अधिकारी वर्गांच्या उपस्थिती मधे सर्व मुद्दे ऐकून घेत काही ज्वलंत प्रश्न तातडीने मार्गी लावू तसेच इतर समस्या एक आठवड्याचा अवधी मध्ये सोडविण्याचे समाधानकारक आश्वासन दिले.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर, सहाय्यक आयुक्त कार्यालय यांच्या विनंतीनुसार घेराव आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.या आंदोलनावेळी खालील प्रमुख पदाधिकारी सतेश मस्के, राजाराम आढाव, शरद पवार, मोहन धांडे, अमर भंडारे, सनी सावंत, धनंजय तूपलोंढे, शशिकांत सोनावणे हे उपस्थित होते तसेच राजन चरकरी, शंकर लोंढे, सत्यभामा धांडे, कमलेश खनोजिया, आणि महिला तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Comments
Post a Comment