रस्ता माझा मी रस्ताचा, उंडाळे मारुती मंदिर परिसरात पार्किंग ची दुरावस्था.... ग्रामपंचायती मार्फत अभय ? कोण न्याय देणार ,सर्वसामान्याची आर्त हाक .
रस्ता माझा मी रस्ताचा, उंडाळे मारुती मंदिर परिसरात पार्किंग ची दुरावस्था.
ग्रामपंचायती मार्फत अभय ? कोण न्याय देणार ,सर्वसामान्याची आर्त हाक .
उंडाळे - प्रतिनिधि,( प्रदिप पाटील)
उंडाळे ग्रामपंचायत आणि त्याचा कारभार गत पाच वर्षापासुन अजब, गजबचं पाहावयास मिळतो. बसस्थानकावर नेहमीचीचं पार्किंग ची गैरसोय व फुटपाथवर अतिक्रमण नित्याचीच बाब झाली असुन गावठाण परिसरातही रस्त्यामध्ये पार्किंग दिवसेंदिवस महाभयंकर चित्र दिसुन येत असुन मात्र उंडाळे ग्रामपंचायत या बाबतीत अनभिज्ञ दिसुन येते.
उंडाळे आणि परिसरातील महत्वाची बाजारपेठ उद्यायास येत असून बसस्थानकासह गावठाण परिसरात पार्किंग ची व्यवस्थेवर स्थानिक प्रशासन म्हणुन कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती मार्फत हेतु परस्पर लोकप्रतिनिधीच्या हितासाठी दुर्लक्ष होत असून त्याच्या अधिपत्याखाली काहि मंडळी स्वार्थ साथत आपला तो "बाबु दुस-याचं ते कारंट" या अविर्भावात वावरंत असुन माझंच ते माझंच आणि दुसऱ्या चं तेही माझंच याच्या अतर्गतं सार्वजनिक ठिकाणी आपल्या गाड्या रस्त्यामध्ये लावुन सार्वजनिक वाहतूकीस अडथळा करत आहेत, मात्र दिवसेंदिवस चित्र प्रकाशमय होत असतानाही झोपेचे सोंग घेतलेल्या स्थानिक प्रशासनास यांचे काहीही देणेघेणे नसल्याचे प्रामुख्याने दिसुन येते.
याबाबत स्थानिक प्रशासनास माहिती देवुनही कारवाई करण्यास दिरंगाई का?.आणि कोण्याच्या सागंण्यावरुन होत आहे .असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे .

Comments
Post a Comment