हळदीकुंकू समारंभ सखी सौभाग्यवती खेळ पैठणीचा करंजे येथे संपन्न.
हळदीकुंकू समारंभ
सखी सौभाग्यवती खेळ पैठणीचा करंजे येथे संपन्न.
सातारा:जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी सोसायटी करंजे, गार्डे मळा येथे महिलांसाठी अंगणवाडी क्र. 205, बिट, वर्ये यांनी गार्डे मळ्यातील मैदानावर 'सखी सौभाग्यवती खेळ पैठणीचा' कार्यक्रम आयोजित केला होता.
हळदी कुंकू समारंभासाठी शंभर हुन अधिक महिला उपस्थित होत्या. सातारा न्यूज चैनल चे वैभव बोडके यांनी खेळासाठी प्रोत्साहित करून सूत्रसंचालन केले.
प्रथम येणाऱ्या सखी "सो. सुषमा मनोज मुळीक यांना पैठणी चा मान मिळाला. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सौ.प्रिया राहुल शिंदे या सखीस मिळाले.
समारंभाचे नियोजन अंगणवाडी सेविका सौ.सुजाता खिलारे व मार्गदर्शन अरुणा लोखंडे मॅडम यांनी केले. समारंभासाठी विशेष सहकार्य सौ.घाडगे व सौ. सपकाळ यांनी केले. यावेळी सौ. इदंलकर, सौ. कामटे, सौ. खामकर यांचाही सहभाग होता. समारंभासाठी प्रमुख पाहुणे वनिता भंडारे, भोसले शेडगे, चाळके या उपस्थित होत्या. समारंभ पार पाडण्यासाठी सौ. सुजाता खिलारे, सौ सकुंडे, रोहिणी कुंभार सौ.लोखंडे, सौ.गार्डे आणि गीता पाटील यांचे सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment