तेरा वर्षाच्या निरागस "जान्हवीला " मदतीची गरज .

 तेरा वर्षाच्या निरागस "जान्हवीला " मदतीची गरज  .

  

  शिराळा -  प्रतिनिधी (आनंदा सुतार)

    कोकरुड ता.शिराळा येथील कु.जान्हवी संजय घोडे या निरागस बाळाची करुन कहाणी  घरी आई  वडील  आणि लहाण भाऊ असा परीवार आहे .जान्हवी इयत्ता ७ च्या वर्गात अजय इंटरनॅशनल स्कुल रेड ता.शिराळा येथे शिकत असुन ती शांत निरागस आहे, ती आजारपणाशी लहान पणा पासुनच दोन हात करत आहे.

  जान्हवीचे वडील संजय घोडे हे शेतकरी कुंटुबातील आहेत. त्यांना वडीलार्जीत पंधरा गुंठे शेत जमिन आहे, त्यावरच त्यांचा व कुंटुबाचा गाडा चालु आहे! जान्हवीच्या दवाखण्यामुळे खर्च वाढतच चाललायं यामुळे खर्च काही केल्याने भागत नाही,म्हणुन बॅकेचे कर्ज काढुन तसेच पै पै जमा करुन पोटच्या गोळ्याचा दवाखना सुरु ठेवला आहे.

    चिल्ड्रन हाॅस्पीटल महालक्ष्मी मुंबई येथील डाॅक्टरांनी  बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही वैद्यकीय प्रक्रिया त्वरीत करणे गरजेचे असल्याचे सांगितले असुन, त्यासाठी एकुण अपेक्षीत खर्च ३५ लाख ५० हजाराच्या घरात  येईल  हे ऐकुण जान्हवीच्या घरच्याचं मात्र कंबरटेच मोडले आहे.

   मागील तेरा वर्षे बाळाचे रक्त बदलुन कसबसं त्याला जगवले,आणि आत्ता पर्यत याचा संपुर्ण आर्थीक ताण कुंटुबावरच पडत होति.यामुळे कुंटुबाचे जगंण मुश्कील झाले आहे.

तरीही या कुटुबांची  केवीलवाणी धडपड सुरुच आहे पण एवढ्या मोठ्या खर्चाच करायच तरी काय!!! म्हणुन ते आता चितांग्रस्त आहेत. मात्र अजुन जिद्द सोडलेली नाही.  वडील समाजात फिरुन मदतीची हाक देत आहेत,तर आई बिचारी पै पाहुण्यानं जवळ हात पसरुन मदतीची विनंती करत आहे.

  आता मात्र समाजातील दानशुर व्यक्तिनी  जान्हवीच्या वैद्यकीय खर्चासाठी मदतीचा हात देणे गरजेचे असुन जान्हवीच्या आई  वडीलांची केवीळ वाणी धडपड जाणुन घेणे गरजेचे आहे. तरी समाजातील दानशुर व्यक्तींनी जान्हवीच्या बॅक आँफ इंडीया  कोकरुड  या शाखेच्या खाते नंबरवर १५१४१८२१०००४५२६  (IFSC CODE BKID0001514) मदतीचा हात द्यावा.


      तिला ही हसायंच आहे....खेळायंच आहे.. शाळेत जाऊन शिकायचेआहे...

  बाल मित्रांसोबत मौज मजा अन् मस्ती करायची आहे.मात्र नियतीलाच ते मान्य  नाही आणि शरीर ही तिला साथ देत नाही .  जान्हवीच्या रक्त दोषाच्या निगडीत थॅलेसिमीयि मेजर या आजाराने त्रस्त आहे,प्रत्येक महीन्याला तीच रक्त बदलावं लागत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .