बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवकांची फौज उभी करणार.

 

बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  (A)  युवकांची फौज उभी करणार.

कराडः प्रतिनिधि,

भारताला महासत्ता बनविण्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्याच प्रमाणे बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील युवकांची फौज उभी करणार. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या नुकत्याच जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या .यावेळी निलेश गाडे यांची युवक जिल्हाध्यक्ष पदी  निवड करण्यात आली. रविराज लोंढे  युवक कराड तालुका अध्यक्ष,  दिनकर जाधव कराड तालुका युवक उपाध्यक्ष ,रोहित हनुमंत चव्हाण  युवक कराड तालुका कार्याध्यक्षपदी ,सुरज लोंढे तालुका उपाध्यक्ष पदी  इत्यादी निवडी करण्यात आल्या व संबंधित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. रिपब्लिकन पक्षामध्ये बहुजन वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करायचा असेल तर रिपब्लिकन  पक्षापासून दुरावलेला तरुण एकसंध केला पाहिजे आणि त्यांना स्वाभिमानाने पक्षाची व आंबेडकरी चळवळीची महती सांगून अभिमानाने जगायला शिकवले पाहिजे तरच डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्षाचे ध्येय पूर्ण होईल अगोदरच्या  रिपाई ए मधील पदाला चिटकून राहणाऱ्या व्यक्तींच्या मुळे तरुणांना संधी मिळाली नाही परंतु ज्यांनी पक्षांमध्ये एकाधिकारशाही आणली ती एकाधिकारशाही आता दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे संपुष्टात आली आहे, त्यामुळे नवतरुणांना संधी देऊन सामाजिक आणि राजकीय प्रवाहात आणून बहुजनांना सत्तेची दारे खुली करावयास लावायचे काम इथून पुढच्या काळात होईल, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये युवकांची मोठी फौज उभा करून पंधरा पंधरा वर्षे पदाला चिटकून बसणाऱ्या रक्तपिपासू नेत्यांना धडा शिकवला जाईल , अशा बेगडी नेत्यांमुळेच युवक चळवळीपासून कोशो दूर गेला आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपली दोन नबंर उद्योग लपवण्यासाठी समाजाचा व पक्षाचा वापर करणार्यास धडा शिकवण्यासाठी युवकांच्या बरोबरच रिपब्लिकन ब्ल्यू फोर्से कार्यकर्ते सज्ज झाले आहेत यावेळी जनरल कामगार मदन खंकाळ ब्लू फोर्स चे अध्यक्ष किरण ओव्हाळ ,अश्विन गायकवाड, सनीदेव खरात, दीपक गाडे, जयवंत कांबळे,पवन धायगुडे, किरण कुंभार,शंकर साठे, गणेश साठे, चव्हाण विक्रम ,दीपक माने, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .