कोडोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप.

 

    कोडोली  ग्रामपंचायतीच्या सरपंच  पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप.


कार्वे - प्रतिनिधि,
कोडोली ता. कराड येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार जि. प. सदस्य उदयसिंह पाटील (उंडाळकर )यांचे हस्ते सत्कार करणेत आला. 
कोडोली ता. कराड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. सरपंच पदी सौ मीनाक्षी कैलास जगताप तर उपसरपंच पदी सचिन बाजीराव जगताप यांची एकमताने निवड करणेत आली. त्या निमित्ताने सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य  हनीफ शिकलगार, संदीप होनकळसे, विद्या शिंदे, विक्रम थोरात, विक्रम पाटील, अर्चना वाघमोडे, सुजाता लोकरे, वर्षा मदने, शिला जगताप यांचा उदयसिंह पाटील यांचे हस्ते सत्कार करणेत आला. 
या वेळी सुभाष जगताप, भरत जगताप, प्रतापसिंह जगताप, विक्रमसिंह जगताप, माजी उपसरपंच घनश्याम जगताप, संदीप मोरे, दत्तात्रय जगताप, पै. आबा जगताप, अभिजित जगताप इ ची उपस्थिती होती. यावेळी उदयसिंह पाटील यांची कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी   पदी निवड झालेबद्दल कोडोली गावाच्या वतीने सुभाष रामचंद्र जगताप यांनी सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .