सार्वजनिक पाणी पुरवठा, कनेक्शन काहीच्या घरात ..
सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, नळ कनेक्शन मात्र काहींच्या घरात .
"उंडाळे ग्रामपंचायत चा अजब कारभार ."
उंडाळे - प्रतिनिधि (प्रदिप पाटिल)
उंडाळे ग्रामपंचायतीच्या मार्फत वैयक्तिक पाणी पुरवठाच्या नळ कनेक्शन देण्यासह सार्वजनिक ठिकाणी नळ कनेक्शन काढण्यात आली आहेत. बहुतांश ठिकाणी "दलित वस्ती सुधार योजना पाणी पुरवठा"च्या माध्यमातून दलित वस्तीसह गावामध्ये काहि ठिकाणी या माध्यमातून सार्वजनिक नळ कनेक्शन काढण्यात आले होते. काळाच्या ओघात सार्वजनिक असणारे नळ कनेक्शन स्वमालकीचे होण्याबरोबर या ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत संबंधिताना अभय देण्यासह वरकमाईवर भर देवुन ग्रामपंचायत शिपाई मात्र शिरजोर झाल्याचे चित्र दिसुन येत आहे त्याच बरोबर यांना अभय हे सरपंच का ग्रामसेवकांचे हे काळाबरोबर न उलघडलेले कोडेचं म्हणावे लागेल.
उंडाळे येथील पाणी पुरवठ्यासाठी दोन ठिकाणहुन पाणी पुरवठा करण्यात येतो. बहुतांश वैयक्तिक घरामध्ये कनेक्शन असुन त्या मार्फतचं पाणी पुरवठा केला जातो. तर उन्हाळामध्ये सार्वजनिक असलेल्या "दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाणी पुरवठेच्या पाणी टाकीतुन गावामध्ये पाच ते सहा ठिकाणी सार्वजनिक कनेक्शन काढण्यात आली होती. मात्र त्यामध्ये सध्या दलित वस्तीमध्ये व टाकीसह एखाद्या च ठिकाणी हे कनेक्शन पाहण्यात येत असुन इतर ठिकाणी असणारे सार्वजनिक कनेक्शन हे स्वमालकीचे करुन घेण्यात आले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
या बाबतीत अनेक वेळा प्रश्न विचारले असता उंडाळे ग्रामपंचायत व कर्मचाऱ्यांकडुन या विषयी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येते.
ज्या ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्शन जोडण्यात आले होते त्या ठिकाणी कोणताही पुरवठा न ठेवता स्वमालकीच्या कनेक्शन ची सध्यस्थित निवडुन आलेल्या सदस्यांनी पोलखोल करुन सर्वसामान्यांना साठी खुल्ले करता आहेत का? "येरे माझ्या मागल्या" ची अवस्था राहते आहे हे पाहणे औचित्याचे ठरेल.
सार्वजनिक नळ कनेक्शन नविन घरासाठी संजिवनी.
दलित वस्ती सुधार पाणी पुरवठाचे बहुतांश नळ कनेक्शन हे नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरासाठी संजीवनी ठरत असुन , मात्र सार्वजनिक ठिकाणी पाण्याची प्रकर्षाने कमतरता जाणवुन येत आहे. याबाबतीत घरासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनकडुन दिवसातुन तीन तीन वेळेला पाणी सोडण्यात येत असुन पिण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी काही वेळेला कमतरता जाणवते.
सव्हिसिंग सेंटरलाही लाजवेल अशी अवस्था
सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या खाजगीकरण करण्या-याच्या घरासमोरील गाड्या मात्र आरशालाही लाजवतील अशा अवस्थेत दिसुन येतात त्यासाठी दिवसातुन सकाळ , संध्याकाळी धुण्यात कोणतीही कसर ठेवण्यात येत नाही.

Comments
Post a Comment