Posts

जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर .

Image
  सातारा   जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक  कार्यक्रम जाहीर .               सातारा, दि. 30 : जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सातारा जिल्ह्यातील  एकूण 10 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूकीकरिता संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर झालेला आहे. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये  सदर निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील असे उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.    कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे, मांगवाडी, आदर्शनगर, उत्तर तांबवे, कोयनावसाहत, पश्चिम उंब्रज, बेलवाडी, शितळवाडी, नाणेगांव बु. व फलटण तालुक्यातील  परहर बु. या एकूण 10 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.    निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येत...

आदरणीय स्व. पी.डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Image
  आदरणीय स्व. पी.डी. पाटील यांच्या जयंतीदिनी प्रतिष्ठानच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन. कराड- प्रतिनिधी. येथील आदरणीय  पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने, दि. १ जुलै रोजी आदरणीय स्व. पी. डी. पाटील यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवार पेठ येथील निवासस्थानी, सकाळी ९ वाजता स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी, प्रतिष्ठानचे विश्वस्त व संयोजन समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तद्नंतर सर्व विश्वस्त आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या 'समाधीस्थळी' पुष्प अर्पण करण्यासाठी जाणार आहेत. प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा 'आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गेली २ वर्षे स्थगित करण्यात आला होता. आता, २०२२ च्या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता प्रतिष्ठानचे कार्यालय 'अनंत कॉम्प्लेक्स' मंगळवार पेठ, याठिकाणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पा...

एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ.

Image
  एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ. तळमावले/वार्ताहर आषाढी वारीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी 34 सेमी बाय 20 सेमी या आकाराच्या एका पानावर संपूर्ण हरिपाठ लिहण्याचा प्रयत्न केला आहे. हरिपाठ म्हणजे नेहमी ईश्वराचे नामस्मरण करण्यासाठी केलेली अभंग रचना होय. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्त्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. यामध्ये मुख्यत्वे संत ज्ञानेश्वर महाराज कृत अभंग जास्त गायले जातात. डाॅ.संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीण्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. यंदाचे वारीचे औचित्य साधून त्यांनी एका पानावर हरिपाठ लिहला आहे. यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकारामांचे चित्र, शब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन, 16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा, घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग व...

पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.

Image
 पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.   सातारा दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह पाटण येथे  सन 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता 8 वी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अन. जाती, अनु. जमाती, अनाथ व दिव्यांग या संवर्गातील  मुला-मुलींनी शासकीय वसतिगृह पाटण येथे त्वरीत संपर्क साधावा असे, गृहपाल शासकीय वसतिगृह पाटण यांनी कळविले आहे.  

सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद.

Image
  सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद . तळमावले/डाॅ.संदीप डाकवे अवघ्या 5 वारकरी यांच्यासह सुरु झालेल्या दिंडीमध्ये आज 100 हून अधिक वारकरी आणि भक्त सहभागी होत आहेत. हीच वारीची यशस्वीता आहे. श्री समर्थ सदगुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेतून माऊली दिंडी सलतेवाडी ता.पाटण येथून निघते. या गावात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर आहे, त्यामुळे या दिंडी ला "माऊली दिंडी" संबोधले जाते. दिंडीची सुरूवात सन 1988 साली श्री सदगुरू हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने झाली. गावात माऊलीचे मंदिर आहे म्हणून महाराजांनी जशी आळंदीहून माऊलींची दिंडी निघते त्याच दिवशी आपल्या गावातूनही दिंडी निघावी ही महाराजांनी गावकऱ्यांना प्रेरणा दिली व प्रसाद दिला. दिंडी चालक म्हणून महाराजांचे शिष्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी याची नियुक्ती करण्यात आली. सुरूवातीला पहिल्या वर्षी पाच वारकरी निघाले त्या पाचाचे आता शंभराच्या वरती वारकरी झाले आहेत. आज या दिंडीला 35 वर्षे पुर्ण झालीत. दिंडीमध्ये ह.भ.प.बाबूराव महाराज सलते व ह.भ.प.नारायण महाराज सलते यांच्या नियोजनातून कार्यक्रम राबवल...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे ऑनलाईन वेबिनार संपन्न.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे  ऑनलाईन वेबिनार संपन्न. उंडाळे - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पोतदार यांचे नुकतेच ऑनलाईन वेबिनार संपन्न झाले. त्यांनी एक्सप्लोरिंग द इंटरफेस बिटविन ड्रग डेव्हलपमेंट बायो.  इमॅजिंग अँड ड्रग डिलिव्हरी या विषयावरती  मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. पंकज पोतदार यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. यावेळी डॉ. पोतदार यांनी विविध प्रकारच्या औषधांचे संशोधन कसे केले जाते, ते कसे शोधले जाते त्यासाठीच्या विविध प्रक्रिया, प्रकल्प हे राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारे पार पडतात त्यासाठी लागणारी उपकरणे याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रा. दिप्ती पाटील यांनी केले.

८ ऑगस्ट ला अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन.

Image
  ८ ऑगस्ट ला अ.भा.ग्रा.पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन. चांदूर रेल्वे येथे अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक . गोंडवाना  न्यूज ब्युरो रीपोर्ट-  अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी ची बैठक केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय  विश्रामगृह येथे घेण्यात आली. या बैठकीमध्येअ.भा. पत्रकार संघाचे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन येत्या ८ ऑगस्ट ला राम गणेश गडकरी सभागृह, ठाणे येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून  केंद्रीय सचिव अशोक पवार,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, प्रदेश सरचिटणीस प्रा.रवींद्र मेंढे,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब सोरगीवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीमध्ये पत्रकारांचे प्रश्न व समस्या यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी अखिल भारतीय पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन ८ ऑगस्ट रोजी राम गणेश गडकरी सभागृह,ठाणे येथे आयोजित केले असुन ...