पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.
पाटण येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु.
सातारा दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह पाटण येथे सन 2022-23 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इयत्ता 8 वी ते पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील अन. जाती, अनु. जमाती, अनाथ व दिव्यांग या संवर्गातील मुला-मुलींनी शासकीय वसतिगृह पाटण येथे त्वरीत संपर्क साधावा असे, गृहपाल शासकीय वसतिगृह पाटण यांनी कळविले आहे.

Comments
Post a Comment