बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार.

 

बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार.

 बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील. 


कराड, दि. 9 (प्रतिनिधी) - बळीराजा शेतकरी संस्था या नावाने काहींनी संस्था रजिस्टर केली आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेचा वापर करावा मात्रा बळीराजा शेतकरी संघटनेचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.

गेल्या आठ दिवसापासून बळीराजा शेतकरी संघटनेमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. त्या पाश्वभूमीवर संघटनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी जी काका पाटील, जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पंजाबराव पाटील म्हणाले, राज्यात शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे होतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पिळून निघतो आहे. शेतकर्‍याला न्याय मिळावा यासाठी बळीराजा शेतकरी संघटना नेहमीच काम करत आली आहे. मात्र आज प्रथमच शेतकर्‍यांच्या साठी नव्हे तर संघटनेच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत घेण्याची वेळ आली आहे. बळीराजा संघटनेचे लेटर पॅड हा काही लोकांचा पोटभरु धंदा झाला आहे. एफआरपी बाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या कमिटीवर बळीराजा शेतकरी संघटनेचा समावेश होता. शेतकरी हीताचे काम करताना संघटनेच्या कार्यकारिणीत नव्या जुन्यांचा मेळ घालावा यासाठी थोडा बदल केला होता. मात्र काहींनी त्यांची वेगळी संस्था काढल्याने आम्ही त्यांची हकालपट्टी केली होती. त्यांच्या बळीराजा शेतकरी संस्थेला आमच्या शुभेच्छा आहेत,  मात्र त्यांनी बळीराजा शेतकरी संघटनेचे लेटर पॅड, शिक्के व बिल्ले यांचा कोठेही वापर करू नये. अशा प्रकारे शेतकरी संघटनेचे नाव कुठे वापरल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू असेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रकाश पाटील, पोपटराव जाधव, अविनाश फुके, सागर कांबळे, बाबासो मोहिते, दीपक पाटील यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

----------------------------------

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .