काले.ता-कराड येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न.
राजकारणाचा पाया हा स्थानीक स्वराज्य संस्था आसल्यानेच त्या मध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष दिले तरच सत्ता मिळेल .
____चंद्रकांत खंडाईत
कराड - प्रतिनिधी.
देशाच्या व राज्याच्या एकूणच राजकारणाचा तसेच सत्ताकारणचा मुळ पायाच ग्रामपंचायत, सोसायटी, नगरपंचायत नगरपरीषद ,महानगरपालीका, जिल्हा परीषद, पंचायत समीती या स्थानीक स्वराज्य संस्था असल्याने आंबेडकरी चळवळीतील कींवा वंचित समुहातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कटाक्षाने लक्ष देऊन या निवडणूका लढल्या पाहीजेत आणि तेथील सत्ताकारणात जाऊन सत्ता केंद्राचा पाया भक्कम केल्या शिवाय संपुर्ण राजकीय सत्ता घेता येणार नाही.त्यासाठी स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाकडे कार्यकर्त्यांनी कटाक्षाने लढवण्याची गरज आसल्याचे मत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु.चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडी तालूका कराड (दक्षिण ) यांच्या वतीने मौजे काले जि.प. प .स गट व गण तसेच कराड व मलकापूर नगरपरीषद यांच्या निवडणूकीबाबत पक्षाची भुमीका व कार्यकर्त्यांनी कशापद्धतीने निवडणूकीस सामोरे जावे यासाठी मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रमुख कार्यकर्ते व पदाधीकारी यांची बैठक वजा मेळावा मौजे काले येथील मंगल कार्यालयाच्या हाँल मध्ये वंचित बहुजन आघाडी चे कराड तालूका उपाध्यक्ष आयु.प्रशांत कांबळे यांच्या आध्यक्षतेखाली व वंचित चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु.चंद्रकांत खंडाईत, सोनार पांचाळ समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. प्रकाशजी पोतदार यांच्या मार्गदर्शना खाली तर जिल्हा सचिव श्री.दादासाहेब केंगार,कराड (द) तालूका निरीक्षक आयु.सुनिल कदम,जिल्हा सदस्य आयु.मिलींद सावंत,सातारा तालुका अध्यक्ष श्रिरंग वाघमारे ,पाटण तालूका अध्यक्ष आयु.बाळासाहेब जगताप,तालुका महासचिव आयु.प्रशांत थोरवडे,शेतकरी संघटनेचे नेते आयु. निलेश थोरवडे,कराड शहर अध्यक्ष आयु.संतोषराव बोलके,मलकापूर शहर अध्यक्ष श्री.तानाजीराव शिंदे व महीला प्रतीनीधी सौ.सवाखंडे यांच्या प्रमुख उपस्तीतीती होती.प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी गावगाड्या मध्ये अनुसूचित जाती, जमाती ,भटके विमूक्त ,ओबीसी, अल्पसंख्यंक व गरीब मराठा या समुहातील सर्वच जनता सत्ता केंद्रापासून वंचित आहे त्यांच्या प्रस्तापीतांनी प्रत्येक समाजामध्ये जाऊन तुमच्या मतावर तूमचा माणूस निवडून येतो का मग मत वाया कशाला घालवता आसा आभास निर्माण करून बहुजन आसणाऱ्या वंचित समुहांना सत्ता केंद्रा पासून दूर ठेवले. वंचित समुहाचा आत्मसन्मान जागृत करून त्यांना त्यांच्या मताधीकाराची कींमत ओळखायला सांगून वंचित समुहाच्या हीतासाठी आपणास स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत लक्ष घालून राजकारनाचा पाया मजबूत करून राज्याची तसेच देशाची सत्ता हस्तगत करन्याची तयारी आता पासूनच केली पाहीजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहीजे आसे मत खंडाईत यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी वंचित समुहातील जनतेच्या छोट्या छोट्या प्रश्नाकडे लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी झटले पहीजे आसे मत दादासाहेब केंगार यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर गावगाड्या मध्ये बहुसंख्य आसणारा ओबीसी समाज वेगवेगळ्या जाती मध्ये आणि विखूरलेल्या स्वरूपात वास्तव्य करत आसल्याने त्यांच्यात असूरक्षीततेची भावना निर्माण झाली आसल्याने त्यांच्यात समुहाने एकत्र राहणाऱ्या वंचित समुहाने सुरक्षीततेची भावना निर्माण करन्यासाठी एकसंघपने प्रयत्न केल्यास ५२% ओबीसी आणी १३% एससी १०% अल्पसंख्यांक आशा ७५%मतदारा पैकी ३५% मतदारांनी जरी आत्मसन्मानाने वंचित बहुजन आघाडीला सहकार्य केले तरी आपन सत्तेत येऊ शक्तो हा आत्मवीश्वास वंचित समुहामध्ये या निवडणूकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी करावा असे मत सोनार पांचाळ समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रकाशजी पोतदार यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सचिव सुनिल कदम,कुंभार सर,भारतीय बौद्ध महासभेचे तालूका अध्यक्ष लोखंडे सर,बनसोडे दादा यांनी ही यावेळी उपस्तीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्रस्ताविक मलकापूर शहर अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कराड शहर अध्यक्ष संतोषराव बोलके यांनी मानले यावेळी संजय लादे,अश्वीनी कांबळे,अरूण वाघमारे,भगतसींग कांबळे,बुवा कुंभार,किशोर शिंदे,तुषार सोनोवने,अरवींद अडसूळे,यशवंत काळे ईत्यादी प्रमुख कार्यकर्ते व काले जि.प. व प.स. कराड शहर व मलकापूर शहर पदाधीकारी मेळाव्यास उपस्तीत होते.





Comments
Post a Comment