सौ . गीता पाठक यांना आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार.

 सौ . गीता पाठक यांना आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार.

कराड - प्रतिनिधी.

 पुणे येथील काव्य मित्र संस्थेच्या वतीने सौ गीता पाठक यांना राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. गीता पाठक या गेल्या पंचवीस वर्षांपासून नाट्य व सिनेअभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण पातळीवरील अनेक  नाटकातून काम केले आहे. राज्य नाट्य एकांकिका, मराठी मालिका, व सिनेमा असा त्यांचा प्रवास सुरू आहे. गेली चार वर्षापासून त्या व्यसनमुक्तीचे काम करतात. आज पर्यंत शंभर हून अधिक लोक त्यांच्या या कार्यामुळे व्यसन मुक्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, डॉक्टर जयश्री घोडके, जगदीश थोरवे, डॉक्टर वंदना वाहुल, भाऊसाहेब जंजिरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी काव्य मित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सागर, संजय जगताप, हरिनाथ कांबळे, उपस्थित होते. त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहे यामध्ये महासोली येथील  जय हनुमान नाट्य मंडळाचे अंजीरराव सूर्यवंशी यांसह विविध संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.            

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .