कराडच्या कृषी दूतांचे बहे येथील शेतकर्‍यांना मार्गदर्शन.

 कराडच्या कृषी दूतांचे बहे येथील शेतकर्‍यांना मार्गदर्शन.

मलकापुर / प्रतिनिधी.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेठरे बुद्रुक  येथील कृषी   महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाळवा तालुक्याल बहे येथील शेतकर्‍यांची भेट घेऊन वृक्ष लागवडी संदर्भात केले मार्गदर्शन यावेळी सरपंच छायाताई पाटील,उपसरपंच डाॅ.सुवर्णा पाटील, मा.सरपंच बी.जी.पाटील विठ्ठल पाटील,जयकर पाटील यांची उपस्थिती होती.  

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच प्राणवायु देणार्‍या वृक्षांची लागवड  संवर्धन करणे मोलाचे आहे. किंबहुना ती काळाची गरजच आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या बांधावर व उपलब्ध जागेमध्ये वृक्ष लागवड केली पाहिजे असे कृषी दुतांनी शेतकर्‍यांना पटवून सांगितले. तसेच शेती क्षेञांमध्ये नवनविन तंञज्ञान विकसीत झाले असुन त्याचा वापर करुन शेतकर्‍यांनी अधूनिकतेची कास धरावी असे आवाहन कृषी मंडळ अधिकारी विवेक ननावरे यांनी केले.

यावेळी कृषी  सहाय्यक जयदिप पाटील कृषीदूत धैर्यशील जाधव,अभिषेक मोरे, सत्यजित पाटील,वैभव पाटील,योगेश पाटील आदित्य थोरात,भास्कर जाधव, दिपक भिलवडे, यांची उपस्थिती होती. 

सदरचे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य जयकर पाटील, केदार  पाटील,प्रशांत थोरात, यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे स्वागत मनोज पाटील यांनी केले आभार धैर्यशील जाधव यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .