स्वराज्य पोलीस मित्र संघटना सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न.

 स्वराज्य पोलीस मित्र संघटना सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात संपन्न.


सातारा: प्रतिनिधी. (सागर पाटील.)

भारत सरकार मान्यताप्राप्त स्वराज्य पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात सातारा येथे पार पडला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी  आणि न्यायहक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून आज स्वराज्य पोलीस मित्र संघटना संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.महिलांवरील अन्यायाला वाचा फोडणारी,समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणारी स्वराज्य पोलीस मित्र संघटना म्हणून अल्पावधीतच नावारूपाला आलेली आहे.आज या संघटनेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो शाखा मोठया तळमळीने समाजसेवेचा वारसा अखंडपणे चालवत आहेत.संपूर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेली एकमेव पोलीस मित्र संघटना म्हणून स्वराज्य पोलीस मित्र संघटना ओळखली जाते.अन्यायाला वाचा फोडणारी आणि लोकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या संघटनेचा सातारा शहर शाखेचा उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात  जल्लोषात पार पडला. यावेळी स्वराज्य पोलीसमित्र संघटना संस्थापक / अध्यक्ष. श्री.दिपक कांबळे ,प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे,सातारा जिल्हा अध्यक्ष सौ.अरुणा लोखंडे मॅडम,सातारा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ,पाटण तालुका अध्यक्ष राजेंद्र सपकाळ, सातारा शहर अध्यक्ष राजेंद्र सपकाळ तसेच विशेष उपस्थिती म्हणून सातारा तालुका पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस श्री. हंकारे सर,मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख सागर पाटील,अभिनेते आणि सातारा जिल्हा सचिव पोपट सानप ,सरचिटणीस श्री. बाबासाहेब जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रप्रभा कोळी,जिल्हा संपर्क प्रमुख मनीषा फाळके,सह संपर्क प्रमुख दीपाली ससे, जिल्हा संघटक विद्या कदम  सातारा तालुका संघटक सुनंदा बलाळ, समाधान शेळके,कुमार कारंडे,संतोष भोसले ,रोहन राजेशिर्के तसेच सातारा शहर कार्यकारणी उपस्थित होती, यावेळी  लोकांनी संघटनेच्या रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .