रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रात साथरोग जनजागरण अभियान.
रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रात साथरोग जनजागरण अभियान.
कराड - प्रतिनिधी.
पावसाळा चालू झाल्याने शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या असून पूर्व खबरदारी म्हणून जनजागृती चालू केली आहे.
साथरोग जनजागरण अभियान प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बुद्रुक अंतर्गत सर्व गावांमध्ये दि.1/6/2022 पासून वैद्यकीय अधिकारी डॉ अनिता कदम व डॉ किरण धायगुडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सी एच ओ आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक आरोग्य सेविका गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून साथरोग,हिवताप जनजागरण अभियान राबविण्यात येत आहे या मोहिमेदरम्यान जिल्हा हिवताप अधिकारी सातारा श्रीमती अश्विनी जंगम मॅडम यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्यासमवेत भेट देऊन माननीय सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधून जलजन्य व किटकजन्य आजारा संदर्भात मार्गदर्शन केले तसेच प्रा.आ. केंद्रातील कर्मचारी यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेची पाहणी, ओटी टेस्ट ब्लिचिंग पावडर पाहणी ,कंटेनर सर्वे, हर घर दस्तक मोहीम व कोविड लसीकरण इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Comments
Post a Comment