Posts

मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत

Image
  मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने, सक्षमतेने होण्यासाठी मदत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण   सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : गुन्ह्यांचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व त्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पध्दतीने व अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले. पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व दोन आयसर बसचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी,...

दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन.

Image
  दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबवा यासाठी निवेदन. शिराळा - प्रतिनिधी. दलित वस्ती सुधार योजनेतील राजकीय हस्तक्षेप थांबावा यासाठी निवेदन देण्यात आले.भारतीय बौद्ध महासभा शिराळा तालुका उपाध्यक्ष  सुनिल घोलप  यांच्या नेतृत्वाखाली   केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  आयु.रामदासजी आठवले यांना  निवेदन  पश्चिम महाराष्ट्र सचिव  आयु.जगन्नाथ ठोकळे नगरसेवक  सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्या हस्ते  देण्यात आले. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत असणाऱ्या कामांना  पालकमंत्री खासदार, आमदार  यांची शिफारस पत्रांची आवश्यकता कशासाठी तसेच  संरक्षण भिंत व सामाजिक सभागृह ही मोठी कामे रद्द केली आहेत,त्या कामांचा समावेश करावा.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले गटाची बैठक  हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे येथे संपन्न झाली. यावेळी हे निवेदन देण्यात आले.यावेळी  आयु.ठोकळे  म्हणाले  आर. पी. आय. आठवले गट शिराळा तालुक्यात सक्षम पणे उभा करून तारूणांना उद्योजक बनवू  राज्यातील व...

आपत्तीतील हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

Image
  आपत्तीतील हानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी अशोक काकडे - शिराळा तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थितीचा घेतला आढावा सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : संभाव्य आपत्तीत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या. शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिराळा येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याबरोबर विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मान्सून कालावधीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल, पोलीस, पाटबंधारे, आरोग्य, बांधकाम, विद्युत विभाग, जिल्हा परिषद व प्रसारमाध्यमे यांचा योग्य समन्वय ठेवणे गरजेचे आहे.जिल्हा व तालुका स्तरावर करावयाच्या तात्काळ उपाययोजना संबंधित विभागांनी कराव्यात. नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावेत. प्रशिक्षि...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन कराड - प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास  या  विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड येथील प्रा. डॉ. साधना शाही या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यास करत असताना एखादा विषय जर अवघड जात असेल तर  त्या विषयाचे मुद्दे एका पानावरती सगळे लिहून घ्यावेत व ते लक्षात राहण्यासाठी तेच तेच परत वाचावेत, तसेच अभ्यास करताना वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे  असून  सकाळी लवकर उठून पहिल्यांदा अवघड विषयाचा अभ्यास करावा व नंतर राहिलेल्या विषयांचा, तसेच एखादी गोष्ट आपण एका व्यक्तीजवळ बोललो तर तीच गोष्ट तो दुसऱ्या व्यक्तीला कशी सांगतो व दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीजवळ कशी सांगते  म्हणजेच आपण पहिल्या व्यक्तीला बोललेली गोष्ट ही तिसऱ्या व्यक्तीजवळ जाईपर्यंत कशी बदलते हे त्यांनी प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवले. तसेच आपल्...

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी

Image
  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी._____डॉ. अशोक यादव. कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे 19 महाराष्ट्र बटालियन कराड एनसीसी विभाग यांचे वतीने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -आयुष्यमान भारत याविषयीचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अशोक यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे- आयुष्यमान भारत म्हणजे देशातील गोरगरीब नागरिकांची संजीवनी होय. भारत सरकारने निर्माण केलेल्या या योजनेत कोट्यावधी लोक सहभागी आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी घेताना या योजनेने रुपये पाच लाखापर्यंत चे अनुदान नागरिकांच्या साठी दिलेले आहे. आज आरोग्याचा प्रश्नांचा विचार केला तर गोरगरीब माणसांना आर्थिक परिस्थिती अभावी दवाखान्याचा खर्च परवडत नाही. पैशाअभावी अनेकांचे आरोग्य धोक्यात येते. परंतु या योजनेत सहभागी झाल्यामुळे रुपये पाच लाखापर्यंत चा मोठा खर्च शासन करते. त्यामुळे पात्र असलेल्या नागरि...

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान.

Image
  ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान.                               _______प्रो.( डॉ.) सतीश घाटगे.   कराड - प्रतिनिधी.   श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथालय विभागाच्या वतीने उत्साहात साजरी झाली.ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते, यावेळी बोलताना कार्यक्रमाचे पाहुणे म्हणाले की ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे व्यक्तिमत्व म्हणजे विद्यार्थी वाचकांचे प्रेरणास्थान! रंगनाथन हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते. एक गणिताचे अभ्यासक असून देखील ग्रंथालय चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ग्रंथालय अभ्यासासाठी ते लंडनला गेले व परत आल्यानंतर ग्रंथालय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्त...

महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो

Image
  महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो ____प्राचार्य प्रो. ( डॉ.) सतीश घाटगे   कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे बी.ए.भाग एक व बी.कॉम. भाग एक विद्यार्थ्यांच्या साठी सांस्कृतिक विभागाच्या वतीने नवागतांचे स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते.आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणामुळे विद्यार्थी ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावात्मक पातळीवर यशस्वी होतो. महाविद्यालयीन शिक्षण ही घरात बसून शिकण्याची प्रक्रिया नाही. वर्गात प्रत्यक्ष बसून घेतलेले शिक्षण हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयात विविध उपक्रम साजरे केले जातात. विविध विषयांचे ज्ञान मिळते. ज्ञानातून माणूस क्रियाशील बनतो व सुसंस्कारित विचाराने तो भावात्मक दृष्ट्या उत्तम तयार होत असतो. गुरुजनांचे दररोजच्या व्याख्यानातून अध्यापनातून विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार होतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी...