कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

कराड - प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे व्यक्तिमत्व विकास  या  विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराड येथील प्रा. डॉ. साधना शाही या उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभ्यास करत असताना एखादा विषय जर अवघड जात असेल तर  त्या विषयाचे मुद्दे एका पानावरती सगळे लिहून घ्यावेत व ते लक्षात राहण्यासाठी तेच तेच परत वाचावेत, तसेच अभ्यास करताना वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे  असून  सकाळी लवकर उठून पहिल्यांदा अवघड विषयाचा अभ्यास करावा व नंतर राहिलेल्या विषयांचा, तसेच एखादी गोष्ट आपण एका व्यक्तीजवळ बोललो तर तीच गोष्ट तो दुसऱ्या व्यक्तीला कशी सांगतो व दुसरी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीजवळ कशी सांगते  म्हणजेच आपण पहिल्या व्यक्तीला बोललेली गोष्ट ही तिसऱ्या व्यक्तीजवळ जाईपर्यंत कशी बदलते हे त्यांनी प्रात्यक्षिक करून त्यांनी दाखवले. तसेच आपल्या जीवनाकडे बघत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, तसेच तुम्हाला आलेल्या संकटाचा  विचार  करून  त्याच्यावरती मात करता आली पाहिजे  असे सांगितले.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  प्रा. अरुणा परीट  यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .