विद्यार्थ्यांने सापडलेला मोबाईल केला परत.
विद्यार्थ्यांने सापडलेला मोबाईल केला परत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून विद्यार्थ्याला शाबासकी ,कौतुक व अनोखी भेट.
कराड - प्रतिनिधी.
शाळेच्या प्रांगणात दुपारच्या वेळेस सापडलेला महागडा मोबाईल फोन कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याची घटना घडली आहे. टिळक हायस्कूल कराडमध्ये इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या सोहम संतोष वायदंडे रा. सोमवार पेठ कराड यांला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासीलदार यांनी शाबासकी देत कौतुक केले आहे .
यावेळी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर,सज्जन जगताप, संग्राम पाटील श्रीमती भोसले यांची उपस्थिती होती.दिनांक 5-8 2025 रोजी दुपारच्या वेळेस टिळक हायस्कूलच्या प्रांगणात realme 5 g कंपनीचा मोबाईल फोन सोहम वायदंडे याला सापडला होता. त्याने हा मोबाईल आपल्या पालकांना शाळेत सापडला आहे असल्याचे सांगितले त्यानंतर सोहम वायदंडे व पालकांनी हा मोबाईल कराड शहर पोलीस ठाण्यात जाऊन जमा केला त्यानंतर पोलीस प्रशासनाने हा मोबाईल कोणाचा आहे.याचा शोध घेत सदरचा हा मोबाईल खात्री करून मूळ मालकास सौ वैशाली वाढेकर रा.मंगळवार पेठ कराड यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला. एखाद्या वेळेस अचानक मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर त्या व्यक्तीला आपला जीव गेल्यासारखे वाटते असेच काहीसे वैशाली वाडेकर यांच्यासोबत झाले काही दिवसापूर्वीच विकत घेतलेला realmi कंपनीचा मोबाईल फोन त्यांनी आपल्या मुलाला शाळेची फी भरण्यासाठी दिला होता. मात्र तो मोबाईल फोन त्यांच्या मुलाकडून शाळेत हरवला असल्याचे मोबाईल मालकांनी यावेळी सांगितले. मात्र सोहम वायदंडे याला हा मोबाईल फोन शाळेच्या प्रांगणात पाण्याची टाकीजवळ सापडला व त्याने हा मोबाईल उचलून मुख्याध्यापक यांना याची कल्पना देऊन ,पालकासोबत पोलीस ठाण्यात जाऊन जमा केला.त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तासीलदार कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर संग्राम पाटील तसेच टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक वाघमारे, शिक्षक ,कर्मचारी यांच्या वतीने सोहमच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करण्यात आले आहे.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात कोणतीही वस्तू सापडली तर कोणीही परत देत नाही परंतु शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहून कौतुक केले तितकेच कमी आहे बालवयामध्ये मुलांचा प्रामाणिकपणा पाहून इतर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे राहायला पाहिजे.याचे जिवंत उदाहरण मुलांनी अनुभवले.विद्यार्थ्याने हरवलेला मोबाईल परत करणे हि एक चांगली गोष्ट आहे.आणि ही त्याची प्रामाणिकपणा दर्शविते विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे.त्याचा अर्थ असा की त्याला चोरी करणे किंवा दुसऱ्याची वस्तू स्वतःसाठी वापरणे योग्य नाही हे समजले आहे.हरवलेली वस्तू परत करणे ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे ज्याची वस्तू हरवली आहे त्याला दिलासा मिळतो आणि समाजात विश्वास वाढतो.
अशा घटना समाजाला एक सकारात्मक संदेश देतात सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ असतात सध्या मोबाईल चोरीच्या घटनेत वाढ होत असताना या मुलांने दाखवलेला प्रामाणिकपणा उल्लेखनीय असून जो आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. असे कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी यावेळी सांगितले.



Comments
Post a Comment