कोडोली हायस्कूल मध्ये प्रतिक्षा पाटील हिचा सत्कार
कोडोली हायस्कूल मध्ये प्रतिक्षा पाटील हिचा सत्कार
कार्वे प्रतिनिधी:-
भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली मध्ये प्रशालेची माजी विद्यार्थी प्रतिक्षा पाटील हिची MPSC मधून महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मोरे आय. जे सर यांनी शाल, श्रीफळ गुलाब पुष्प देऊन तिचा सत्कार प्रशालेमध्ये केला.
या कार्यक्रम प्रसंगी प्रतिक्षा पाटील हिने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन, जिद्द, अभ्यास करण्याची चिकाटी व आत्मविश्वास या गोष्टी आत्मसात कराव्यात असे तिने प्रतिपादन केले. तिचे प्राथमिक शिक्षण कोडोली जि. प. प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण भारती विद्यापीठाचे, हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली येथे झाले. तसेच उच्च माध्यमिक शिक्षण SGM कॉलेज कराड येथे झाले. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य शेतकरी कुटुंबातील असून तिने हे यश संपादन केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढालाईत मॅडम यांनी केले. आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ. जाधव मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमास प्रशालेचे शिक्षक श्री. आंबी सर, श्री. पाटील सर, शिक्षकेत्तर कर्मचारी,इयत्ता ८वी ते १०वी मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment