कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

उंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे इनोवेटीव थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीस अँड फार्मासुटिकल ॲप्लीकेशन या विषयावरती एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, घोगाव येथील मॅकॅनिकल अँड मॅकॅट्रोनिक्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे एच.ओ.डी. प्रा. भरतराज भोसले व प्रा. आशिष कणसे हे उपस्थित होते.

यावेळी भरतराज भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थ्रीडी म्हणजे आकार घडविणे आणि आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवणे, थ्रीडी प्रिंटिंगची प्रक्रिया ही पातळ आवरण असुन हे द्रव पदार्थ पावडर, प्लास्टिकचा वापर करून होते. तसेच थ्रीडीचा फायदा म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात मटेरियल खराब होत नाही व त्याची प्रक्रिया आकार, कापणे, छापणे व प्रक्रिया या चार प्रक्रियेत होते. फार्मसी क्षेत्रात आपण औषधे तयार करताना कसा वापर करू शकतो, हेल्थकेअर मेडिसिन्स, घरे बांधण्यासाठी, अवयव तयार करणे, त्वचेचे टिशू तयार करणे तसेच मेडिकलमध्ये याचा वापर आपण करू शकतो असे सांगितले. तर आशिष कणसे यांनी विद्यार्थ्यांना थ्रीडी प्रिंटिंगचे प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्याकडून फार्मसी क्षेत्रातील थ्रीडी ऑब्जेक्ट तयार करून घेतल्या.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा परीट व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .